Kaali: क्रिएटिव्हीटी दाखवायला हिंदू देव-देवताच सापडतात का? ती 5 प्रकरणं जेव्हा मोठा वाद झाला, आता काली मातेच्या तोंडी ‘सिगारेट’

हिंदू देवदेवतांचा अपमान करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. हिंदू देवदेवतांचा (Hindu God) अपमान करण्याची ही काही पहिलीची वेळ नाही. याआधीही अशा विविध घटना घडल्या आहेत आणि त्यावरून मोठा वादही निर्माण झाला आहे.

Kaali: क्रिएटिव्हीटी दाखवायला हिंदू देव-देवताच सापडतात का? ती 5 प्रकरणं जेव्हा मोठा वाद झाला, आता काली मातेच्या तोंडी 'सिगारेट'
क्रिएटिव्हीटी दाखवायला हिंदू देव-देवताच सापडतात का? ती 5 प्रकरणं जेव्हा मोठा वाद झाला
Image Credit source: Twitter
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jul 06, 2022 | 3:10 PM

देवी कालीच्या पोस्टरवरून (Kaali Poster Row) सध्या देशभरात मोठा वाद निर्माण झाला आहे. निर्मात्या लीना मणिमेकलाई (Leena Manimekalai) यांनी त्यांच्या ‘काली’ या डॉक्युमेंट्री पोस्टरवर देवी कालीच्या हातात सिगारेट दाखवलंय. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप त्यांच्यावर होत असून कारवाईचीही मागणी केली जात आहे. अशातच हिंदू देवदेवतांचा अपमान करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. हिंदू देवदेवतांचा (Hindu God) अपमान करण्याची ही काही पहिलीची वेळ नाही. याआधीही अशा विविध घटना घडल्या आहेत आणि त्यावरून मोठा वादही निर्माण झाला आहे. मग तो एखाद्या चित्रपटाचा पोस्टर असो किंवा ऑनलाइन विकली जाणारी पायपुसणी.. क्रिएटिव्हीटी दाखवायला हिंदू देव-देवताच सापडतात का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याआधी असे कोणते वाद निर्माण झाले होते, ते पाहुयात..

मॅगझिनमध्ये क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीचा वादग्रस्त फोटो-

एका मासिकामध्ये क्रिकेट महेंद्र सिंह धोनीचा हा फोटो छापण्यात आला होता. यामध्ये त्याला विष्णूच्या अवतारात दाखवलं असून त्याच्या हातात चिप्स, कोल्ड-ड्रिंक्स, शूज असे विविध ब्रँड्स दाखवले आहेत. विविध ब्रँड्सच्या जाहिराती तो करत असल्याचं यातून दाखवण्यात आलं होतं. मात्र यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.

अजय देवगणच्या छातीवर शंकराचा टॅटू-

एका चित्रपटात अभिनेता अजय देवगणच्या छातीवर शंकराचा टॅटू काढलेला दाखवण्यात आला. यामुळे शीख समुदायाकडून प्रचंड टीका झाली होती. कारण चित्रपटात अजयने पंजाबी व्यक्तीची भूमिका साकारली होती. वादानंतर अखेर अजयला माफी मागावी लागली होती. इतकंच नव्हे तर त्याने अमृतसरला जाऊन शीख प्रतिनिधींचीही भेट घेत त्यांची समजूत काढली. त्यानंतर हे प्रकरण मिटलं.

पायपुसणीवर गणपतीचा फोटो

ई कॉमर्स कंपनी ॲमेझॉनकडून विकल्या जाणाऱ्या एका पायपुसणीवर गणपतीचा फोटो होता. लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे ॲमेझॉनवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली गेली. शिवाय हिंदू देवतांचे फोटो असलेले टॉयलेट कव्हरही या साईटवर विकले जात होते. यामध्ये गणपती, हनुमान आणि महादेवाचे फोटो होते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागल्यानंतर या वस्तू ॲमेझॉनने हटवल्या होत्या.

शूजवर हिंदू देवतांची चित्रे

2010 मध्ये, कॉनवर्स कंपनीने हिंदू देवतांची चित्रं असलेले नवीन डिझायनर शूज लाँच केले होते. यामुळे त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. अखेर कंपनीने निवेदन जारी करत माफी मागितली आणि अमेरिकेतून हे शूज काढून घेतले होते.

ब्रह्मात्र चित्रपटावरून वाद

हे सुद्धा वाचा

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा आगामी ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात अडकला. चित्रपटातील एका गाण्यात रणबीरने चप्पल घालून मंदिरात प्रवेश केल्याचं दाखवलं गेलं. यावरून सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला. या टीकेनंतर गाण्यातून हे दृश्य हटवलं देलं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें