AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandu : झी स्टुडिओजचा ‘पांडू’ येतोय प्रेक्षकांना हसवायला!, विनोदातील हुकुमी एक्के करणार धमाकेदार मनोरंजन

महाराष्ट्राला विनोदाची एक मोठी परंपरा लाभलेली आहे. मराठी साहित्य असो की मराठी चित्रपट, मराठी नाटक असो की मराठी लोककला या सर्व कलाप्रकारात विनोदाचं स्थान कायमच वेगळं आणि अढळ असं राहिलेलं आहे. या विनोदी परंपरेला मोठं करण्याचं काम केलंय इथल्या अनेक विनोदवीरांनी. (Zee Studios' 'Pandu' is coming to make the audience laugh!)

Pandu : झी स्टुडिओजचा 'पांडू' येतोय प्रेक्षकांना हसवायला!, विनोदातील हुकुमी एक्के करणार धमाकेदार मनोरंजन
| Edited By: VN | Updated on: Oct 30, 2021 | 2:18 PM
Share

मुंबई : या वर्षाच्या सुरुवातीला ‘पांडू’ (Pandu) चित्रपटाची घोषणा झाली आणि तेव्हापासून ‘पांडू’ नेमकं कोण साकारणार, या चर्चांना वेग आला. पण आजच लाँच झालेल्या ह्या चित्रपटाचा टिझरने ‘पांडू’ आणि ‘महादू’ची जोडी प्रेक्षकांसमोर आणलीये. ‘भाऊ कदम’ आपल्याला ‘पांडू’ च्या भूमिकेत तर कुशल बद्रिके ‘महादू’च्या भूमिकेत दिसणार आहे. ही महाराष्ट्राची लाडकी जोडी मोठा पडदा गाजवण्यासाठी आणि प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झालीये.

विनोदातील हुकुमी एक्के

महाराष्ट्राला विनोदाची एक मोठी परंपरा लाभलेली आहे. मराठी साहित्य असो की मराठी चित्रपट, मराठी नाटक असो की मराठी लोककला या सर्व कलाप्रकारात विनोदाचं स्थान कायमच वेगळं आणि अढळ असं राहिलेलं आहे. या विनोदी परंपरेला मोठं करण्याचं काम केलंय इथल्या अनेक विनोदवीरांनी. काळू-बाळूपासून ते अशोक सराफ- लक्ष्मीकांत बेर्डेपर्यंत विनोदवीरांच्या अनेक जोड्यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. आजच्या घडीला विनोदातील हुकुमी एक्के म्हटलं की सर्वप्रथम नाव येतं ते भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या जोडीचं.

भाऊ कदम यांनी व्यक्त केल्या भावना

या चित्रपटात ‘पांडू’ ही मुख्य व्यक्तिरेखा साकारत आहेत भाऊ कदम. या भूमिकेबद्दल बोलतांना भाऊ म्हणाले की, ” सध्याच्या या तणावाच्या परिस्थितीत प्रेक्षकांना मनोरंजनाच्या दोन घटका देणे आणि त्यांचा ताण हलका करणे यासारखं पुण्याचं काम दुसरं काहीच नाहीये. ‘पांडू’ प्रेक्षकांची ही गरज शंभर टक्के पूर्ण करेल असा मला विश्वास आहे. दिग्दर्शक विजू मानेंसोबत काम करण्याचा अनुभव कायमच मजेशीर राहिलेला आहे आणि सोबतीला कुशल असल्यामुळे ही केमिस्ट्री अजूनच चांगली खुलून आली आहे. ही भूमिका साकारणं माझ्यासाठी फार मोठी आणि महत्वाची बाब आहे.”

कुशल यांनी व्यक्त केल्या भावना

तुफान एनर्जीची देणगी लाभलेला आणि कोणतंही पात्र लिलया साकारणारा कुशल या चित्रपटाबद्दल म्हणतो की,”मी या चित्रपटात महादू हवालदाराची भूमिका साकारतोय. मी आणि भाऊ, आम्ही आजवर विविध माध्यमांतून लोकांचं मनोरंजन केलंय. हीच परंपरा हाही चित्रपट कायम ठेवेल यात शंकाच नाही. गेल्या २१ वर्षात आमच्यातली मैत्री खूप घट्ट विणली गेलीये आणि हीच मैत्री पांडू आणि महादूच्या निमित्ताने प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. अशात ‘पांडू’सारखा चित्रपट प्रेक्षकांना नुसतं हसवणारच नाही तर एक नवी ऊर्जाही देईल हा विश्वास मला आणि आमच्या संपूर्ण टीमला आहे.”

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे निर्माण झालेली तणावाची परिस्थिती आणि लॉकडाऊनमुळे आलेलं नैराश्य दूर करण्यासाठी व प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी झी स्टुडिओजची निर्मिती असलेला आणि विजू माने यांनी दिग्दर्शित केलेला ‘पांडू’ येत्या ३ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. चित्रपटाला अवधूत गुप्तेंच्या संगीताची साथ लाभली आहे.

मनोरंजनाचं परिपूर्ण पॅकेज असलेला ‘पांडू’ हा येत्या ३ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. तेव्हा लॉकडाऊनचा ताण अनलॉक करण्यासाठी या ‘पांडू’ची भेट घ्यायलाच हवी.

संबंधित बातम्या

Mouni Roy : मौनी रॉयची दुबईत धमाल, पाहा अभिनेत्रीचे बोल्ड फोटो

‘इर्शाद’ नव्हे ‘काव्य पहाट’, ‘No Bindi No Business’नंतर आता शेफाली वैद्यंचा मोर्चा संदीप खरे-वैभव जोशींच्या कार्यक्रमाकडे!

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल