नवाजुद्दीन सिद्दीकीच्या लेकीला पाहिलंत का? लेटेस्ट लूक पाहून चाहते म्हणाले “ही ऐश्वर्या रायच”

बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक असलेला नवाजुद्दीन सिद्दीकी. त्याच्या अभिनयाचे तसेच सर्वच चाहते आहेत. नवाजुद्दीन त्याच्या नवीन चित्रपट ‘कोस्टाओ’मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 1 मे रोजी ZEE5 वर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे स्क्रीनिंग देकील नुकतेच पार पडले. त्यावेळी चित्रपटाची स्टारकास्ट आणि निर्माते ही होते. तर स्क्रीनिंगला नवाजुद्दीन सिद्दीकी त्याची मुलगी शोरा सिद्दीकीसोबत पोहोचला होता. आता, […]

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या लेकीला पाहिलंत का? लेटेस्ट लूक पाहून चाहते म्हणाले ही ऐश्वर्या रायच
Shora Siddiqui
Image Credit source: Instagram
| Updated on: May 05, 2025 | 6:22 PM

बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक असलेला नवाजुद्दीन सिद्दीकी. त्याच्या अभिनयाचे तसेच सर्वच चाहते आहेत. नवाजुद्दीन त्याच्या नवीन चित्रपट ‘कोस्टाओ’मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 1 मे रोजी ZEE5 वर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे स्क्रीनिंग देकील नुकतेच पार पडले. त्यावेळी चित्रपटाची स्टारकास्ट आणि निर्माते ही होते. तर स्क्रीनिंगला नवाजुद्दीन सिद्दीकी त्याची मुलगी शोरा सिद्दीकीसोबत पोहोचला होता. आता, चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान नवाजचा त्याच्या लेकीसोबतचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या लेकीची तुलना थेट ऐश्वर्यासोबत

पण तेव्हापासून फक्त तिचीच चर्चा होताना दिसत आहे. शोरा एका काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये स्क्रीनिंगसाठी आली होती. पण यातील अभिनेत्याच्या मुलीकडे लक्ष देत आहेत.आणि ती या आउटफिटमध्ये खूप सुंदर दिसत होती. सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ व्हायरल होताना पाहून लोक तिची तुलना थेट ऐश्वर्या रायलाच्या तरुण असतानाच्या लूकशी करू लागले आहेत.


शोराने वेधलं सर्वांचे लक्ष

काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे की, शोराला पाहून असे वाटते की महाकुंभाची व्हायरल गर्ल मोनालिसा आहे. तर काहींनी ती तिच्या वडिलांसारखी दिसल्याचं म्हटलं. शोराला पाहिल्यानंतर अनेकांनी ती ऐश्वर्या रायसारखी दिसते असेही म्हटले आहे. ऐश्वर्या तिच्या सुरुवातीच्या काळात अशी दिसत होती. शोराने तिच्या लूकने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.


नवाजच्या मुलीला पाहिल्यानंतर लोकांनी काय म्हटलं?

या व्हिडिओवर एका युजरने लिहिले आहे की, ‘ती सुंदर आहे, पण ऐश्वर्यासारखी दिसत नाही’. एकाने लिहिले, ‘शोरा खूप सुंदर आहे आणि ती अभिनेत्री होण्यास पात्र आहे’. तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटलं आहे, ‘ती मोनालिसासारखी दिसते, सुंदर आहे’. चौथा वापरकर्त्याने म्हटलं , ‘ही खूप गोड दिसतेय. हिला चित्रपटांमध्ये घेतलं पाहिजे.’ शोरा आणि तिचे सौंदर्य पाहून लोक आता अशाच प्रकारच्या कमेंट्स पोस्ट करत आहेत. दरम्याम शोरा अजूनही तिचं शिक्षण करत आहे. पण नवाजचे चाहते त्याची मुलगी चित्रपटात कधी प्रवेश करेल याची वाट पाहत आहेत.