AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्बल 3200 कोटींची कमाई, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता ओटीटीवर; कधी अन् कुठे पाहू शकता?

जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडलेला हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होण्यास सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे भारतीयांना या चित्रपटांचा अनकट व्हर्जन पहायला मिळणार आहे. कधी आणि कुठे ते जाणून घ्या..

तब्बल 3200 कोटींची कमाई, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता ओटीटीवर; कधी अन् कुठे पाहू शकता?
या हॉरर चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांना लावलं वेड Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 26, 2026 | 12:23 PM
Share

अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या एका सायकोलॉजिकल हॉरर थ्रिलर चित्रपटाची सध्या जगभरात जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे एका 26 वर्षांच्या युट्यूबरने हा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘ऑब्सेशन’. या चित्रपटाला आयएमडीबीवर (IMDb) दहा पैकी 8.2 अशी दमदार रेटिंग मिळाली आहे. करी बार्कर दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले आहेत. आता प्रेक्षक या हॉरर चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची प्रतीक्षा करत आहेत. भारतात या चित्रपटातील महत्त्वाच्या सीन्सवर सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवल्याने काही प्रेक्षकांची निराशा झाली होती. आता ओटीटीवर त्यांना अनकट व्हर्जन पाहता येणार आहे.

‘मूव्ही वेब’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘ऑब्सेशन’ हा चित्रपट येत्या 30 जून रोजी डिजिटलवर रेंटवर उपलब्ध होणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांना ठराविक शुल्क भरावं लागणार आहे. मात्र 30 जून रोजी कोणत्या वेळी हा चित्रपट स्ट्रीम होईल, याची अद्याप माहिती समोर आली नाही. तुम्ही हा चित्रपट ‘पीकॉक’ (Peacock) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सबस्क्रिप्शनसह हा चित्रपट अद्याप स्ट्रीम होणार नाही. त्यामुळे चाहत्यांना फक्त ठराविक शुल्क भरूनच तो ऑनलाइन पाहता येणार आहे. या चित्रपटाची सबस्क्रिप्शन रिलिज डेट अद्याप समोर आली नाही.

‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाने जगभरात तब्बल 3200 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर भारतात या चित्रपटाच्या कमाईचा आकडा 93.60 कोटी रुपये इतका आहे. या चित्रपटाने भारतात पहिल्याच दिवशी 1.75 कोटी रुपये आणि पहिल्या आठवड्यात 18.55 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यातील कमाईचा आकडा थेट 31.25 कोटी रुपयांवर पोहोचला होता. 15 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

मायकल जॉनस्टन आणि इंटे नवरेट यांचा हा हॉरर थ्रिलर चित्रपट आधी 2 जून रोजी ओटीटीवर स्ट्रीम होणार होता. मात्र चित्रपटाला थिएटरमध्ये मिळणारा प्रतिसाद पाहून निर्मात्यांनी ओटीटी रिलीज पुढे ढकलली. ‘पिकॉक’ या प्लॅटफॉर्मनंतर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाईल, असंही कळतंय.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत