Shefali Shah: ‘डार्लिंग्स’मधल्या किसिंग सीनवर शेफाली शाहची प्रतिक्रिया; म्हणाली “ये क्या हो गया?”

| Updated on: Aug 12, 2022 | 11:58 AM

गेल्या आठवड्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या आलिया भट्ट आणि शेफाली शाह यांच्या 'डार्लिंग्स' या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

1 / 5
गेल्या आठवड्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या आलिया भट्ट आणि शेफाली शाह यांच्या 'डार्लिंग्स' या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. जसमीत के. रीन यांनी दिग्दर्शित केलेल्या या डार्क कॉमेडी चित्रपटातील कलाकारांच्या दमदार अभिनयाचं कौतुक होत आहे.

2 / 5
कौटुंबिक हिंसाचारवर एका वेगळ्या पद्धतीने भाष्य करणाऱ्या या चित्रपटात बरेच ट्विस्ट आणि टर्न्स आहेत. यातील एका दृश्यात शेफाली शाह ही रोशन मॅथ्यूला किस करतानाही दाखवलं गेलंय. या किसिंग सीनवर शेफालीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.

3 / 5
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत शेफाली म्हणाली, "मी जेव्हा स्क्रिप्ट वाचली तेव्हा त्या सीनबद्दल वाचून मला आश्चर्याचा धक्का बसला. असे दोन सीन्स या चित्रपटात आहेत, ज्यांमुळे मी चकीत झाले. एकतर किसिंग सीन आणि दुसरा म्हणजे चित्रपटात दाखवलेला शमशूचा भूतकाळ. या दोन्ही गोष्टी अनपेक्षित होत्या."

4 / 5
"ये क्या हो गया (हे काय झालं?) असा विचार माझ्या मनात आला. पण ते सीन अत्यंत नाजूकपणे हाताळणं गरजेचं होतं. झुल्फी या व्यक्तीरेखेनं पोलिसांसमोर सत्य उघड करू नये म्हणून ती पटकन त्याला किस करते. पण तरीसुद्धा माझ्यासाठी हा सीन म्हणजे आश्चर्यकारकच होता", असं ती पुढे म्हणाली.

5 / 5
डार्लिंग्स या चित्रपटात आलिया भट्ट, शेफाली शाह, विजय वर्मा, रोशन मॅथ्यू, राजेश शर्मा, संतोष जुवेकर यांच्या भूमिका आहेत.