बापरे! वाशिममध्ये बालकांना ‘मिस-सी’ आजाराची लागण; आतापर्यंत 30 पेक्षा अधिक बालके आजाराच्या विळख्यात

जिल्हातील कोरोना ओसरल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडलेला असतानाच आता वाशिम जिल्ह्यात बालकांना 'मिस-सी' आजाराची लागण होताना दिसत आहे. वाशिम जिल्हातील 30 पेक्षा अधिक बालके मिस-सी आजाराच्या विळख्यात अडकले आहेत.

बापरे! वाशिममध्ये बालकांना मिस-सी आजाराची लागण; आतापर्यंत 30 पेक्षा अधिक बालके आजाराच्या विळख्यात
मिस-सी आजार
| Edited By: | Updated on: Sep 03, 2021 | 3:56 PM

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट आता महाराष्ट्रामधून ओसरताना दिसत आहे. मात्र, तिसरी लाट येण्याची भिती कायम आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्हांमध्ये कोरोना जवळपास ओसरला आहे. त्यामध्ये वाशिम जिल्हा देखील आहे. (Children infected with Miss-C disease in Washim district)

जिल्हातील कोरोना ओसरल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडलेला असतानाच आता वाशिम जिल्ह्यात बालकांना ‘मिस-सी’ आजाराची लागण होताना दिसत आहे. वाशिम जिल्हातील 30 पेक्षा अधिक बालके मिस-सी आजाराच्या विळख्यात अडकले आहेत. यामुळे नागरिकांची डोके दुःखी वाढली आहे. जिल्ह्यात 15 वर्षांपर्यंतच्या बालकांमध्ये मिस-सी आजाराची वेगवेगळी लक्षणे दिसत आहेत.

यामध्ये डोळे लाल होणे ,जीभ लाल होणे ,जिभेवर सूज येणे ,पायावर सूज येणे अशी काही प्रमुख लक्षणे बालकांमध्ये दिसून येत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये आता भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर डॉक्टरांकडून बालकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मिस-सी आजाराची कोणतेही लक्षण दिसल्यावर त्वरीत डाॅक्टरांची संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हामध्ये गेल्या काही दिवसांपासून डेग्यूनेही डोकेवर काढले होते. वाशिममध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. आरोग्य विभागाकडे या महिन्यात 4 रुग्णांची नोंद करण्यात आली. प्रामुख्याने खासगी रुग्णालयात उपचार करण्यावर रुग्णांचा भर आहे. दरम्यान, जिल्ह्यात 3 महिन्यांत 20 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. असं असली तरी डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची नोंद अद्याप आरोग्य विभागाकडे नाही.

या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत. तुरळक प्रमाणात जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. त्यात लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. डेग्यू नियंत्रणासाठी गावागावात उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच जिल्हामध्ये मलेरीयाच्या रूग्णांचा धोका देखील वाढला आहे.

मिस-सी आजाराची ही प्रमुख लक्षणे-

1) डोळे लाल होणे ,

2) जीभ लाल होणे ,

3) जिभेवर सूज येणे

5) पायावर सूज

6) रक्तदाब कमी होणे

संबंधित बातम्या : 

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प घट, सक्रिय रुग्णसंख्या 3.99 लाखांवर

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ सुरुच, सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा चार लाखांच्या दिशेने

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा उसळी, सक्रिय रुग्णसंख्याही 3.78 लाखांवर

(Children infected with Miss-C disease in Washim district)