AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता इराणचं काही खरं नाही, 25 शक्तिशाली देशांनी घेरलं, जागतिक पातळीवर घडामोडींना वेग

Iran in Trouble : जगातील 25 हून अधिक शक्तिशाली देशांनी इराणविरुद्ध भूमिका घेतली आहे. खाडी क्षेत्रातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या सर्व देशांनी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे.

आता इराणचं काही खरं नाही, 25 शक्तिशाली देशांनी घेरलं, जागतिक पातळीवर घडामोडींना वेग
Iran strait of hormuzImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 21, 2026 | 9:38 PM
Share

इराण विरुद्ध अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक देशांचा तेल पुरवठा थंडीत झाला आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होताना दिसत आहे. अशातच आता जगातील 25 हून अधिक शक्तिशाली देशांनी इराणविरुद्ध भूमिका घेतली आहे. खाडी क्षेत्रातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युएई, अमेरिका, युके आणि फ्रान्स यांच्यासह अनेक देशांनी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. या निवेदनात इराणकडून होणारे हल्ले जागतिक शांततेसाठी मोठा धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच इराणची मनमानी आता सहन केली जाणार नाही असंही या निवेदनात म्हटले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

या देशांनी निवेदनात म्हटले की, होर्मुझच्या सामुद्रधुणीत जहाजांवर हल्ले करणे म्हणजे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला धक्का देणे होय. हा जलमार्ग जगातील सर्वाधिक तेल पुरवठा होणारा मार्ग आहे. अलीकडे इराणने निःशस्त्र व्यापारी जहाजे आणि तेल पाइपलाईन्सना लक्ष्य केले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने याला सागरी सुरक्षेचे उल्लंघन म्हटले आहे. 25 देशांनी संयुक्त निवेदनात इराणने तात्काळ क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या धमक्या थांबवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. कारण तणाव वाढला, तर त्याचा सर्वाधिक परिणाम जगातील गरीब आणि दुर्बल लोकांवर होईल असंही यात नमूद करण्यात आलं आहे.

होर्मुजमध्ये इराणने तणाव कसा वाढवला?

इराणवर आरोप आहे की त्यांनी होर्मुज मार्ग बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. समुद्रात माईन्स टाकणे आणि ड्रोनद्वारे जहाजांवर हल्ले करणे अशा कारवाया करण्यात आल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत या देशांनी याला आंतरराष्ट्रीय गुन्हा म्हटले आहे. सागरी नेव्हिगेशनची स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे आणि तो हिरावला जाऊ शकत नाही. इराणच्या या कृतींमुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते असं या देशांनी म्हटलं आहे.

जागतिक स्तरावर काय उपाययोजना?

या संकटाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय उर्जा संस्थेने (IEA) ने मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी आपले आपत्कालीन तेल साठे बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. 25 देशांच्या गटाने तेलाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी उत्पादन वाढवण्यावर काम सुरू केल्याचे सांगितले आहे. इतर तेल उत्पादक देशांसोबत मिळून ऊर्जा बाजार स्थिर ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे, जेणेकरून इराणच्या दबावामुळे जागतिक अर्थव्यवस्था थांबू नये.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?