‘शिवभोजन थाळी’ पुढील तीन महिने अवघ्या 5 रुपयात, भुजबळांची घोषणा

| Updated on: Mar 29, 2020 | 2:22 PM

शिवभोजन थाळीचा विस्तार करण्यात आला असून आता दररोज 1 लाख लोकांना शिवभोजन थाळी मिळणार आहे. (Chhagan Bhujbal on Shivbhojan Thali)

शिवभोजन थाळी पुढील तीन महिने अवघ्या 5 रुपयात, भुजबळांची घोषणा
Follow us on

नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ‘शिवभोजन थाळी’ योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. पुढच्या तीन महिन्यांसाठी ‘शिवभोजन थाळी’ 10 रुपयांऐवजी 5 रुपयांमध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (Chhagan Bhujbal on Shivbhojan Thali)

शिवभोजन थाळीचा विस्तार करण्यात आला असून आता दररोज 1 लाख लोकांना शिवभोजन थाळी मिळणार आहे. या योजनेची वेळही वाढवण्यात आली आहे. सकाळी 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत ही शिवभोजन थाळी मिळणार आहे.

मागच्या तुलनेत तब्बल 5 पट जनतेपर्यंत शिवभोजन थाळी आता पोहोचणार आहे. गरजेनुसार काही ठिकाणी शिवभोजन थाळीचं पार्सलदेखील दिलं जाणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. विशेष म्हणजे शिवभोजन तयार करणाऱ्या व्यक्तींनी नियमांच्या अधीन राहून स्वच्छता ठेवत जेवण तयार करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

याआधी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘शिवभोजन थाळी’ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गर्दी टाळण्यासाठी शिवभोजन थाळी बंद करण्यात आली होती. मात्र गरजूंची होणारी गैरसोय लक्षात घेत ‘शिवभोजन थाळी’ पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

(Chhagan Bhujbal on Shivbhojan Thali)