विवाहित प्रियकराकडून प्रेयसीचा खून, हत्येच्या थरारानं चंद्रपूरमध्ये खळबळ

| Updated on: Nov 01, 2020 | 4:13 PM

गेल्या 10 वर्षापासून अधिक काळपर्यंत या दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू होते. दुर्गा उमरे असं मयत महिलेचं नाव आहे.

विवाहित प्रियकराकडून प्रेयसीचा खून, हत्येच्या थरारानं चंद्रपूरमध्ये खळबळ
Follow us on

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात दिवसाढवळ्या महिलेचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. विवाहित असलेल्या प्रियकराने प्रेयसीची हत्या केली आहे. भर दिवसा वस्तीमध्ये हत्येचा थरार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Murder of a lover by married boyfriend in Chandrapur )

मिळालेल्या माहितीनुसार, विवाहित असलेल्या प्रियकराने दुर्गा उमरे या प्रेयसीचा खून केला आहे. शहरातील जुनोना चौक परिसरातील गजबजलेल्या वस्तीत ही घटना घडली आहे. सतत होणाऱ्या वाद-विवादामुळे संतापलेल्या प्रियकराने लाकडी दांडक्याने हत्या केली. परिसरातील नागरिकांनी पोलिसांना सूचना देतात काही तासात आरोपीला अटक करण्यात आली असू पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गेल्या 10 वर्षापासून अधिक काळपर्यंत या दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू होते. दुर्गा उमरे असं मयत महिलेचं नाव आहे. या हत्या प्रकरणातील आरोपी राकेश ढोले स्वतः विवाहित आहे. मात्र, त्याचे विवाहाच्या आधीपासून दुर्गा उमरे हिच्याशी प्रेमसंबंध होते. लग्नानंतर दीर्घकाळपर्यंत दोघांमध्ये वाद-विवाद होत होते. आज सकाळी दुर्गा उमरे हिने आरोपीला स्वतःच्या घरी बोलावलं. तेव्हा देखील या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं.

या भांडणादरम्यान आरोपी राकेश ढोले याने घरातच असलेल्या एका लाकडी दांडक्याने दुर्गा उमरे हिच्या डोक्यावर वार करत तिला जखमी केलं. दुर्गा घरातच गतप्राण झाली. यानंतर आरोपी घटनास्थळावरून निघून गेला. परिसरातील नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपी राकेश ढोले यांना तातडीने ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.

प्रकरणाचा तपास रामनगर पोलीस करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान जुनोना चौक या अत्यंत गजबजलेल्या वस्तीत झालेल्या या हत्याकांडाने परिसरात दहशत पसरली आहे.

इतर बातम्या –

केसरकर शिवसेनेत आलेले आयत्या बिळावरचे नागोबा, राणेंवरील केसरकरांच्या टीकेला भाजपचे उत्तर

मराठा समाजाचा मशाल मोर्चा, 7 नोव्हेंबरला मातोश्रीवर धडकणार

(Murder of a lover by married boyfriend in Chandrapur )