डी-मार्टच्या वस्तू चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक, 18 लाखांचा मुद्देमाल जप्त, रबाळे एमआयडीसी पोलिसांची कारवाई

| Updated on: Sep 02, 2020 | 12:34 AM

या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 18 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

डी-मार्टच्या वस्तू चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक, 18 लाखांचा मुद्देमाल जप्त, रबाळे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
Follow us on

नवी मुंबई : डीमार्ट स्टोअरच्या ट्रकभर गृहपयोगी वस्तू चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे (Rabale MIDC Police Arrest Thieves). रबाळे एमआयडीसी पोलिसांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 18 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे (Rabale MIDC Police Arrest Thieves).

भिवंडी येथील डीमार्ट वेअर हाऊसमधून गृहपयोगी वस्तू आयशर ट्रकमध्ये भरुन पुणे येथील डीमार्ट स्टोअर येथे घेऊन जात असताना आयशर ट्रक मालक दिवानाका येथे पार्क करुन विश्रांती करिता गेला. तेव्हा डुप्लिकेट चावीच्या साहाय्याने ट्रकसह एकूण 16 हजार किमतीचा माल 12 ऑगस्ट रोजी चोरट्यांनी लंपास केला होता.

रबाळे एमआयडीसी पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करुन 23 ऑगस्ट रोजी चोरी करणाऱ्या चंपालाल चौधरी (वय 30), प्रकाश चौधरी (वय 20) आणि मोहम्मद पठाण (वय 20) अशा तीन गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्याकडून स्विफ्ट कार सुद्धा ताब्यात घेतली आहे. तपासा दरम्यान, चोरीचा माल विकत घेणारा नरेश भानुशाली (वय 37) नाव समोर आले असता 28 ऑगस्ट रोजी भानुशाली याला अटक करण्यात आली.

यांच्याकडून आयशर ट्रक, डीमार्ट स्टोअरच्या गृहपयोगी वस्तू, मोबाईल हेडफोन, डिनर सेट, कपडे, चटई, स्विफ्ट कार असा एकूण 18 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून यांच्यावर चारकोप, घाटकोपर परिसरात चोरीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. रबाळे एमआयडीसी पोलिसांच्या कौतुकास्पद कामगिरी बद्दल संपूर्ण नवी मुंबईत कौतुक केले जात आहे.

Rabale MIDC Police Arrest Thieves

संबंधित बातम्या :

पोटच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न, एक लाखात सौदा करणारी नवी मुंबईची महिला गजाआड

साताऱ्यातील एकाच कुटुंबातल्या चौघांच्या हत्येचे गूढ उकलले

हँडल लॉक तोडून गाडीला आपली नंबर प्लेट, नागपुरात सराईत बाईकचोर जेरबंद