VIDEO : ‘आता अजित पवारांबाबत महत्त्वाची बातमी!’ स्टुडिओमध्ये सुप्रिया सुळे न्यूज अँकरच्या भूमिकेत

खासदार सुप्रिया सुळे यांनी चक्क न्यूज अँकर बनत न्यूज स्टुडिओत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बातमी (Supriya Sule news anchor) दिली.

VIDEO : आता अजित पवारांबाबत महत्त्वाची बातमी! स्टुडिओमध्ये सुप्रिया सुळे न्यूज अँकरच्या भूमिकेत
| Edited By: | Updated on: Feb 28, 2020 | 1:41 PM

जळगाव : खासदार सुप्रिया सुळे यांनी चक्क न्यूज अँकर बनत न्यूज स्टुडिओत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बातमी (Supriya Sule news anchor) दिली. जळगाव दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळे यांनी डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयातील मास मीडिया विभागाला भेट दिली. यावेळी त्यांनी न्यूज अँकरचा (Supriya Sule news anchor) अनुभव घेतला.

सुप्रिया सुळे यांनी महाविद्यालयाच्या ‘सेंटर फॉर मास मीडिया अँड फॉरेन लँग्वेज’ विभागाला भेट देत स्टुडिओची रचना समजून घेतली. तसेच न्यूज अँकर म्हणून बातमी दिली. विशेष म्हणजे न्यूज अँकर म्हणून बातमी देताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बातमी वाचली.

याशिवाय त्यांनी न्यूज अँकर टेलिप्रॉम्प्टरवर बातमी कशी वाचतो, बातमी वाचताना आवाजाचा लय कसा ठेवावा, असे मुद्दे जाणून घेतले. त्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांशी निगडित शेतकरी कर्जमाफीची एक राजकीय बातमी वाचून दाखवली.

दरम्यान, जळगाव दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. तसेच जळगावमधील अनेक समस्या जाणून घेतल्या.