राज्यात कुचकामी सरकार, थोड्या नाही, संपूर्ण मंत्रिमंडळाची कपात करा : भाजप

"मुख्यमंत्री आम्हाला भेटत नाही, त्यामुळे जनतेची प्रश्न आम्हाला राज्यपालांकडे मांडावी लागतात," असेही अतुल भातखळकर म्हणाले.  (Bjp MLA Atul Bhatkhalkar  criticizes Mahavikas Aaghadi)

राज्यात कुचकामी सरकार, थोड्या नाही, संपूर्ण मंत्रिमंडळाची कपात करा : भाजप
Follow us
| Updated on: May 24, 2020 | 6:56 PM

मुंबई : “राज्यात कुचकामी सरकार काम करत आहे. त्यामुळे काही मंत्र्यांचे नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळचं कपात केलं पाहिजे,” असा टोला भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला. “कामगार कपातीप्रमाणे मुख्यमंत्र्यांवर ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ येईल,” अशी भीती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’च्या रोखठोक सदरात  व्यक्त केली होती. त्यावरुन भाजपाचे आमदार अतुल भातखळकर हा टोला लगावला. (Bjp MLA Atul Bhatkhalkar  criticizes Mahavikas Aaghadi)

“राज्यातील सरकार कुचकामी आहे. हे सरकार काहीही काम करत (Bjp MLA Atul Bhatkhalkar  criticizes Mahavikas Aaghadi) नाही. त्यामुळे या मंत्रिमंडळातील काही मंत्री नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळच कपात केलं पाहिजे. त्याने लोकांना काहीही फरक पडत नाही,” असेही अतुल भातखळकर म्हणाले.

“हे सरकार कुंभ करण्याच्या झोपेत आहे. तसेच ते मूक बहिरे आणि आंधळं हे सरकार आहे. संजय राऊत ज्या पद्धतीने काल राज्यपालांना झुकून भेटले. त्यामुळे ते किती बिनकण्याचे आहेत हे दिसून येते,” अशी टीकाही भातखळकरांनी महाविकासआघाडीवर केली.

“मुख्यमंत्री आम्हाला भेटत नाही, त्यामुळे जनतेची प्रश्न आम्हाला राज्यपालांकडे मांडावी लागतात,” असेही अतुल भातखळकर म्हणाले.

संजय राऊत नेमके काय म्हणाले?

महाराष्ट्रात बेरोजगारी वाढणे हे देशाला परवडणारे नाही ,असे मी एका वरिष्ठ अधिकाऱ्यास सांगितले तेव्हा त्याने एक मिश्कील भाष्य केले. “मंत्रालयातही अनेकांच्या हाताला काम नाही, तिथे इतरांचे काय घेऊन बसलात? कोरोनामुळे आय.ए.एस., आय.पी.एस. अधिकाऱ्यांचा एक मोठा गट कामाच्या प्रतीक्षेत उभा आहे. त्यांना काम हवे आहे व तो त्यांचा हक्क आहे.” असं संजय राऊत यांनी ‘सामना’च्या रोखठोक सदरात लिहिलं आहे.

“मागेल त्याला काम ही आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा आहे, पण त्यासाठी काम सुरु व्हायला हवे. महाराष्ट्राचे सर्वच मंत्री आज आपल्या जिल्ह्यात ‘कोरोना’ लढाईत जुंपले आणि गुंतले आहेत. अनेक मंत्र्यांनी तीन महिने मुंबईचे तोंड पाहिलेले नाही. शपथा घेतल्या, पण मंत्रीपदाची चमक आणि धमक मिरवायची सोय नाही अशी सध्याची अवस्था आहे. जे मलईदार खात्यांसाठी भांडत होते ते अशी खाती मिळूनही रिकामेच आहेत. मंत्रालय, सरकारी कचेऱ्या यांच्यातील शांतता हतबलताच दाखवत आहे. हे असेच सुरु राहिले तर कामगार कपातीप्रमाणे मुख्यमंत्र्यांना मंत्रीकपात करण्याची वेळ येईल” असं संजय राऊत म्हणाले.(Bjp MLA Atul Bhatkhalkar  criticizes Mahavikas Aaghadi)

संबंधित बातम्या : 

…तर मुख्यमंत्र्यांवर ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ येईल : संजय राऊत

राज्यात आमचे नाही, शिवसेनेचे सरकार, कथित ऑडिओ क्लिपमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांची खदखद?

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.