आदित्य ठाकरे चिपळूण दौऱ्यावर, आता पाहणी नाही तर मदतीचं काम सुरु असल्याचा दावा

पहिल्या दिवसांत आमचे आमदार, खासदार, जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकारी, एनडीआरएफ, एसडीआरएफ, सेवाभावी संस्था आदींनी रेस्क्यूमध्ये खूप काम केलं आहे. आता मदतकार्याला सुरुवात झाली आहे.

आदित्य ठाकरे चिपळूण दौऱ्यावर, आता पाहणी नाही तर मदतीचं काम सुरु असल्याचा दावा
Aditya Thackeray


चिपळूण : पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती घेतली. आदित्य यांनी चिपळूणमधील चिमुकल्यांशीही संवाद साधला. त्यावेळी बोलताना पूरग्रस्तांना पंचनामे झाल्यावर भरीव आर्थिक मदत केली जाईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. पूरग्रस्तांचं बचावकार्य संपलं आहे आता मदतकार्याला सुरुवात झालीय. त्यामुळे मी पाहणी दौऱ्यावर नाही तर मदत करण्यासाठी आलो असल्याचं यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. (Aditya Thackeray’s Chiplun visit, Communication with flood victims)

चिपळूण आणि महाड या दोन्ही तालुक्यात जात आहे. आता पाहणी नाही तर मदतीचं काम सुरु झालंय. पहिल्या दिवसांत आमचे आमदार, खासदार, जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकारी, एनडीआरएफ, एसडीआरएफ, सेवाभावी संस्था आदींनी रेस्क्यूमध्ये खूप काम केलं आहे. आता मदतकार्याला सुरुवात झाली आहे. अजूनही काही जिल्ह्यात रेड अलर्ट आहे. पण आता पुराचं पाणी ओसरायला सुरुवात झालीय. त्यामुळे शासनाकडून मदत सुरु करण्यात आली आहे. आम्ही शिवसेना म्हणून जी मदत करायची आहे ती करत आहोत. अन्य पक्षही मदत करत आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

‘पंचनामे पूर्ण झाल्यावर पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत’

ही वेळ पक्षीय राजकारण बाजूला ठेवायची आहे. महाराष्ट्रात ते चित्र पाहायला मिळत आहे. आपण सगळे मिळून लोकांसाठीच काही करत आहोत, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. पंचनामे पूर्ण झाल्यावर पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत दिली जाईल. मात्र, आता सुरुवातीच्या काळात आरोग्य तपासणी, घरगुती सामान, स्थलांतर आदी गोष्टी आम्ही करत आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

सरकारमध्ये आंतरविरोधाला सुरुवात – फडणवीस

सत्ता स्थापनेसाठी आम्ही कुठेही प्रयत्नशील नाही. हे सरकार अंतरविरोधाने पडेल. आता आंतरविरोधाला सुरूवात झाली आहे. ज्यादिवशी सरकार पडेल त्यादिवशी आम्ही पर्याय देवू, असा पुनरुच्चार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसंच पूरग्रस्तांवरील संकट मोठं आहे, त्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीस हे पूरग्रस्त पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. कराडमध्ये पाहणी केल्यानंतर आज ते सांगलीला रवाना झाले. त्यादरम्यान त्यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला.

संबंधित बातम्या :

“आजोबा म्हणाले, दौरे टाळा, तरीही नातू चिपळूण दौऱ्यावर; आजोबांचा सल्ला फक्त फडणवीस आणि राज्यपालांसाठी?”

आता शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी असं काही नाही, सध्याचं संकट आणि त्यासाठीचं समर्पण महत्त्वाचं : पंकजा मुंडे

Aditya Thackeray’s Chiplun visit, Communication with flood victims

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI