AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारला कंटाळून डीजीपींनी प्रतिनियुक्तीवर जाणं भूषणावह नाही : देवेंद्र फडणवीस

पोलिसिंग गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येत असलं, तरीही पोलीस विभागाला स्वायत्तता दिली आहे, असा टोला फडणवीसांनी ठाकरे सरकारला लगावला.

सरकारला कंटाळून डीजीपींनी प्रतिनियुक्तीवर जाणं भूषणावह नाही : देवेंद्र फडणवीस
| Updated on: Dec 31, 2020 | 11:19 AM
Share

नागपूर : राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांची CISF च्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली. राज्य सरकारच्या कारभाराला कंटाळून डीजीपी केंद्रात प्रतिनियुक्तीवर चालले आहेत, अशी टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. छोट्या छोट्या कामांतही सरकारचा हस्तक्षेप वाढत चालला आहे, असा आरोप फडणवीसांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला. (Devendra Fadnavis slams Thackeray Govt over Subodh Kumar Jaiswal transfer)

“राज्यात पहिल्यांदाच पोलीस महासंचालकांना विश्वासात न घेता पोलीस विभागाचा कारभार चालला आहे. त्यामुळेच सुबोध जैस्वाल यांनी नाराज होऊन प्रतिनियुक्ती मागितली होती. ती केंद्र सरकारने स्वीकारली आहे. यामुळे राज्य सरकारने समजून घेतलं पाहिजे की पोलिसिंग गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येत असलं, तरीही पोलीस विभागाला स्वायत्तता दिली आहे” असा टोला फडणवीसांनी ठाकरे सरकारला लगावला.

“गृहमंत्र्यांकडे सुपरवायजरी (देखरेखीचं) काम आहे. पण आता बदल्या असो, छोट्या छोट्या कामांतही हस्तक्षेप वाढत चालला आहे. त्यामुळेच अशाप्रकारे डीजीपींनी प्रतिनियुक्ती मागितली आहे. राज्यात पहिल्यांदाच असं घडलंय की सरकारच्या कारभाराला कंटाळून पोलीस महासंचालक गेले. पोलीस विभागाच्या मनोबलावर याचा परिणाम होईल” अशी प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार प्रहार केला.

चंद्रकांत पाटलांकडूनही ठाकरे सरकार लक्ष्य

सुबोध कुमार जैस्वाल हे आपल्या पदावरुन पायउतार होऊन केंद्रीय सेवेत जाणार आहेत. येणाऱ्या काळात देशाच्या पराक्रमी अशा राष्ट्रीय सुरक्षा बल (एनएसजी) च्या सर्वोच्च पदी विराजमान होण्याची शक्यता चंद्रकांत पाटील यांनी नोव्हेंबर महिन्यातच बोलून दाखवली होती. जैस्वाल यांच्याकडे ‘रॉ’ या गुप्तचर संघटनेतील कामाचा अनुभव होता. त्यांनी 2018 मध्ये मुंबईच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली होती. यानंतर त्यांना महासंचालकपदी बढती मिळाली होती, गेल्या काही महिन्यांतील राज्यातील घटनांमुळे सुबोध कुमार जैस्वाल यांच्या भावनांना मोठा धक्का पोहोचला होता. सरकारच्या बहिऱ्या आणि कुचकामी कारभाराला कंटाळूनच जैस्वाल यांनी केंद्रीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे चंद्रकांत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. (Devendra Fadnavis slams Thackeray Govt over Subodh Kumar Jaiswal transfer)

पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांची पोलीस महासंचालकपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी हेमंत नगराळे यांच्या वर्णीची शक्यता, कारकीर्दीवर एक नजर

‘रॉ’चा अनुभव असलेला पोलीस अधिकारी ठाकरे सरकारला कंटाळून केंद्रीय सेवेत; चंद्रकांत पाटलांचं टीकास्त्र

(Devendra Fadnavis slams Thackeray Govt over Subodh Kumar Jaiswal transfer)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.