मुंबईः ”मी उत्तम गाडी चालवतो, उत्तम चालवतो की नाही याची कल्पना नाही. पण सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवतोय”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. मध्ये मध्ये स्पीडब्रेकर येत असतात, खड्डेही असतात. पण तरीसुद्धा स्टेअरिंगवरची पकड मी सुटू देणार नाही. मास्क घालणे, हात धुणू आणि अंतर ठेवणे ही आपली जीवनशैली आता बनलेली आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका कार्यक्रमात बोलत होते. (Driving Both The Car And The Government; Grip On The Steering Wheel Is Tight Says Uddhav Thackeray)
ती जीवनशैली काही वर्ष किंवा महिने तरी आपल्याला अंगीकारावी लागणार आहे. व्हॅक्सिन आल्यानंतरही बूस्टर डोस द्यावे लागलात. तसेच सुरक्षा नियमांचे बुस्टर डोस दिले गेले पाहिजेत, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. विशेष म्हणजे त्याला चंद्रकांत पाटलांनीही प्रत्युत्तर दिलंय.
शिवसेना त्या तिघांमध्ये गेल्यानंतरही जनतेनं भाजपलाच प्राधान्य दिलं: चंद्रकांत पाटील
शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, शिवसेना त्या तिघांमध्ये गेल्यानंतरही जनतेनं भाजपलाच प्राधान्य दिलंय. हे जर उद्धवजींना कळलं असतं. तर मग हे सरकार आलं नसतं, असंसुद्धा चंद्रकांत पाटील म्हणालेत.
तीन पक्ष एकत्र आल्यानं भाजपला स्पेसः देवेंद्र फडणवीस
तीन पक्ष एकत्र आल्यानं भाजपला स्पेस मिळाली असून, भाजपचा विस्तार झालेला आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील 50 टक्के ग्रामपंचायतींसाठी आज या ठिकाणी मतदान होतं. भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आलाय, भाजपनं प्रचंड मोठा विजय मिळवलाय. निसर्ग वादळानंतर घोषणा खूप झाल्या, पण पंचनामे झाले नाहीत. प्रत्येक वेळी फक्त घोषणा झाल्यात, पण कुठेही लोकांना मदत मिळाली नाही. मोदी सरकार मदत करत होते, पण महाराष्ट्रातील सरकारनं फुटकी कवडी दिली नाही. त्यामुळे लोकांचा रोष आपल्याला पाहायला मिळतोय, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
संबंधित बातम्या:
Driving Both The Car And The Government; Grip On The Steering Wheel Is Tight Says Uddhav Thackeray