‘दिखाव्यासाठी इथे आलो नाहीय’, संभाजी भिडे मनोज जरांगे पाटील यांना काय म्हणाले?

| Updated on: Sep 12, 2023 | 11:03 AM

Maratha Reservation : संभाजी भिडे यांना आंदोलन स्थळी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आंदोलनाचा आज 14 वा दिवस आहे.

दिखाव्यासाठी इथे आलो नाहीय,  संभाजी भिडे मनोज जरांगे पाटील यांना काय म्हणाले?
Sambhaji bhiide-Manoj jarange patil
Follow us on

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आज 14 वा दिवस आहे. आंदोलनस्थळी संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर यांच्यासह संभाजी भिडे आले आहेत. संभाजी भिडे यांना आंदोलन स्थळी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. “ही लढाई एक घाव दोन तुकड्यांची नाही. शिवप्रतिष्ठान तुमच्या पाठिशी आहे. जसं पाहिजे तसं, आरक्षण मिळालं पाहिजे” असं संभाजी भिडे मनोज जरांगे पाटील यांना म्हणाले. ते अंतरावाली सराटी येथे आले आहेत. “अजित पवार काळीज असलेला माणूस. शिंदे लबाड नाहीत. फडणवीस बेईमानी करणार नाहीत. उपोषणा थांबवा, लढा थांबवू नका” असं संभाजी भिडे म्हणाले.

“आरक्षणाचा प्रश्न राजकारण्याच्या हातात आहे. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. आता मागे वळून पहायचं नाही” असं संभाजी भिडे म्हणाले. “आरक्षण मिळवूनच या लढ्याचा शेवट झाला पाहिजे” असं संभाजी भिडे म्हणाले. उपोषणा मागे घ्या, असं सरकारच्यावतीने जरांगे-पाटील यांना विनंती करण्यात आली. “मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत, आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. मी इथे दिखाव्यासाठी आलेलो नाही. तुम्ही मागे वळून पहायच नाही. मराठा समजाला पाहिजे तसं आरक्षण मिळालं पाहिजे. जे करताय ते 101 टक्के योग्य आहे. राजकारण्यांच्या हाताता हा प्रश्न आहे. एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे, सध्या जे सत्तेवर आहेत, ते अजित पवार काळीज असलेला माणूस. शिंदे लबाड नाहीत. फडणवीस बेईमानी करणार नाहीत” असं संभाजी भिडे म्हणाले.

‘मराठा समाज हा हिंदुस्थानचा पाठीचा कणा, आत्मा असलेला समाज’

“आपण हे आंदोलन जीवाच्या आकांताने चालवताय. कौतुक करावं एवढ चांगल आंदोलन आहे. मी तुम्हाला उपदेश करायला आलेलो नाही. तुम्ही करताय ती, धर्माची समाजसेवा आहे, या तपश्चर्येचे फळ नक्की मिळणार. राजकारणी आहेत, म्हणून मनातून बिचकू नका. जो शब्द देतील, तो पाळून घ्यायच काम माझ्यावर सोडा. ही लढाई एक घाव दोन तुकडे अशी नाही. आग्रह आहे, जे सत्य आहे त्याबाजूने लढाई यशस्वी होणार. मोठ्या मुत्सद्दीपणे उपोषण थांबवूया. मी तुम्हाला नाउमेद करायला आलेलो नाही. मराठा समाज हा हिंदुस्थानचा पाठीचा कणा, आत्मा असलेला समाज आहे. उपोषण थांबवा लढा थांबवू नये” असं आवाहन संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केलं.