Manoj Jarange: खोटं आश्वासन देऊन गावाला फसवलं, आंदोलनकर्त्या ललिता तारख यांचे मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप

Lalita Tarakh on Manoj Jarange Patil: जुन्या सहकाऱ्यांनी आणि मराठा मोर्चातील पदाधिकाऱ्यांनी मनोज जरांगे यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. आता त्यात आंतरवाली सराटीतील ललिता तारख यांचीही भर पडली आहे. त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Manoj Jarange: खोटं आश्वासन देऊन गावाला फसवलं, आंदोलनकर्त्या ललिता तारख यांचे मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप
ललिता तारख, मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षण आंदोलन
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Sep 27, 2026 | 8:09 AM

Lalita Tarakh on Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्यावर जुने सहकारी, मराठा क्रांती मोर्चातील काही पदाधिकारी आणि आता थेट आंतरवाली सराटीतील आंदोलक नाराज असल्याचे दिसून आले आहे. काहींनी तर त्यांच्याविरोधात मोठा मोर्चा उघडला आहे. थेट ED कडे तक्रार दाखल केली आहे. आता त्यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय असलेल्या ललिता तारख यांची मनोज जरांगे यांच्यावरती टीका केली आहे. जरांगे यांनी 20 दिवसांपासूनचे उपोषण पाटोदा येथे मागे घेतले. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचवेळी सहकारी त्यांच्याविरोधात गंभीर आरोप करत असल्याचे समोर येत आहे.

जरांगेंनी गावकऱ्यांना फसवलं

मराठा आंदोलनामध्ये सक्रिय असलेल्या ललिता तारख यांची मनोज जरांगे यांच्यावरती टीका केली आहे. जरांगे यांनी आमच्या गावाला खोटं आश्वासन देऊन माता माऊल्यांना फसवले. तुमच्या उपोषणाची मी साक्षीदार तुम्ही कसे उपोषण केलं हे मी वेळ आल्यावर सांगेन. भावनिक करून महिलांचा वापर केला, असा गंभीर आरोप जरांगे यांच्यावर तारख यांनी केला.

आंतरवाली सराटीत एकही कुणबी सर्टिफिकेट मिळाले नाही

मनोज जरांगे यांचे चौथे उपोषण मी सोडले. रात्रंदिवस आम्ही आंदोलनासाठी झटत होतो. आंतरवाली सराटी मधून एक देखील कुणबी सर्टिफिकेट मिळाले नाही. हैदराबाद गॅझेटमधून आम्ही दहा महिन्यापूर्वी अर्ज केला आहे. जरांगे यांनी आमच्या गावाला खोटं आश्वासन देऊन माता माऊल्यांना फसवले. भावनिक करून महिलांचा वापर केला. मराठ्यांच्या पंढरपुरामध्ये (अंतरवाली सराटी) मध्ये एक तरी कुणबी नोंद मिळाली आहे का? त्यांनी हैदराबाद गॅझेटीयर नुसार आरक्षण भेटेल असं आश्वासन मनोज जरांगे यांनी आम्हाला दिलं होतं. यापूर्वी आम्ही मंडप काढू नये म्हणून आम्ही पोलिसांना विरोध केला होता. उपोषण केल्यावर माणूस दोन दिवस देखील राहू शकत नाही, अशी टीका ललिता तारख यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली.

आंदोलनस्थळावरील मंडप काढला

मराठा आरक्षण लढ्याचं केंद्रबिंदू असलेल्या अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळावरील मंडप अखेर काढण्यात आला असून महत्त्वाचा म्हणजे जरांगे पाटील यांचं उपोषण करत असलेलं व्यासपीठ देखील काढण्यात आलंय. सरपंच आणि ग्रामस्थांनी निर्णय घेऊन हा मंडप पाडल्याची माहिती समोर आली असल्याने सध्या या ठिकाणी पूर्णतः शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

तर पाटोद्यावरून मुंबई गाठू

दरम्यान काल माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीतील हे शेवटचं आंदोलन होतं असं जाहीर केलं. आम्ही पाटोदापर्यंत पोहचलो होतो. सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर सरकारने मागण्या मान्य न केल्यास पाटोद्यावरून मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल आणि जरांगे पाटील काय भूमिका स्पष्ट करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांचे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us