AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

New Sand Policy : राज्याच्या वाळू धोरणात मोठा बदल; घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी आनंदवार्ता, घर बांधकामाचा खर्च कमी होणार

State New Sand Policy : राज्याच्या वाळू धोरणात मोठा बदल करण्यात आला आहे. याविषयीच्या धोरणाची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. आता हे धोरण स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे घरकुल लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. त्यांचा घर बांधकामाचा खर्च कमी होईल.

New Sand Policy : राज्याच्या वाळू धोरणात मोठा बदल; घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी आनंदवार्ता, घर बांधकामाचा खर्च कमी होणार
वाळू धोरण जाहीर
| Updated on: Oct 10, 2025 | 10:11 AM
Share

राज्याच्या वाळू धोरणात मोठा बदल करण्यात आला आहे. याविषयीच्या धोरणाची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. आता हे धोरण स्पष्ट करण्यात आले आहे. प्रधानमंत्री आवास योजना व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी मोठे बदल या योजनेत करण्यात आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या आदेशानंतर सुधारित निर्णय जारी करण्यात आले आहेत.

10 टक्के मोफत

नवीन वाळू धोरणानुसार, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना 10 टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गरिबांच्या घरकुलाला वाळू मिळण्यासाठी सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. लिलाव धारकांचा आर्थिक बोजा आता सरकार उचलणार आहे. राज्यातील वाळू व्यवस्थापन व घरकुल योजनांना गती देण्यासाठी बदल करण्यात आला आहे. तीन वर्षांतून एकदा होणारा लिलाव आता दरवर्षी होणार आहे. खाणकाम आराखडा, पर्यावरण परवानगी आणि इतर आवश्यक परवानग्या दरवर्षी घ्याव्या लागणार आहे.

याठिकाणी वाचा राज्य शासनाचा निर्णय New Sand Policy GR

नाहीतर तहसीलदारांवर कारवाई

नवीन वाळू धोरणात घरकुल लाभार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर तहसीलदारांनी त्यावर 15 दिवसात निर्णय घ्यायचा आहे. 15 दिवसांत वाळू देण्याची कार्यवाही त्यांना करावी लागणार आहे. नाहीतर तहसीलदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे यापूर्वी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. दगडापासून तयार केलेली वाळू वापरण्यात येणार आहे. क्रेशर्संना उद्योगाचा दर्जा त्यासाठी देण्यात येणार आहे. वाळू डेपोमध्ये जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध होण्यासाठी 31.675 ब्रास वाळू राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाच ब्रास वाळू मोफत वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कृत्रिम वाळूच्या वापराला प्राधान्य

नैसर्गिक वाळूच्या अति उत्खनानामुळे पर्यावरणाचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे राज्यात कृत्रिम वाळूच्या उत्पादन आणि वापराला यापूर्वीच राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे. सार्वजनिक बांधकामांमध्ये या कृत्रिम वाळूचा वापर वाढावा यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. राज्यात वाळूच्या उत्पादनासाठी स्वामित्वधन म्हणून प्रतिब्रास 600 रुपये आकारण्याऐवेजी 200 रुपये रॉयल्टी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डोंगर उत्खननातून मिळणाऱ्या दगडांपासून क्रशरच्या मदतीने तयार होणारी कृत्रिम वाळू नैसर्गिक वाळूला पर्याय ठरू शकते असे सरकारने जाहीर केले आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक