AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकच्या टीसीएस कंपनीच्या बंद दरवाजाआड काय चालायचं? महिला आयोगाचा रिपोर्ट समोर

नाशिकमधील एका मोठ्या आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा छळ होत असल्याचा खळबळजनक खुलासा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात झाला आहे. POSH कायद्याचे उल्लंघन आणि छळाच्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.

नाशिकच्या टीसीएस कंपनीच्या बंद दरवाजाआड काय चालायचं? महिला आयोगाचा रिपोर्ट समोर
nashik
| Updated on: May 13, 2026 | 11:35 AM
Share

नाशिकमधील प्रतिष्ठित कंपनीत गाजलेल्या धर्मांतर प्रकरणाने राज्यात सर्वत्र खळबळ उडाली होती. या प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या निदा खानला अटक करण्यात आली आहे. त्यातच आता याच कंपनीच्या कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांच्या छळाचे अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) या कार्यालयाची पाहणी केल्यानंतर एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात नाशिकमधील त्या कंपनीत कामाचे वातावरण महिलांसाठी विषारी आणि भयावह असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या अहवालामुळे नाशिकमधील कॉर्पोरेट संस्कृतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मानसिक आणि धार्मिक छळाचे गंभीर आरोप

महिला आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींनुसार, या कार्यालयात काम करणाऱ्या तरुण महिला कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असल्याचे समोर आले आहे. यामध्ये केवळ कामाचा दबाव नसून, कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण, स्टॉकिंग आणि बुलिंग सारखे प्रकार घडत असल्याचे अहवालात म्हटले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या ठिकाणी महिलांवर विशिष्ट धार्मिक विचार लादण्याचा आणि धार्मिक तेढ निर्माण होईल असे वागण्याचे गंभीर आरोपही करण्यात आले आहेत.

POSH कायद्याची पायमल्ली

कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी असलेला POSH कायदा या कार्यालयात केवळ कागदावरच असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे: या ठिकाणी तक्रार निवारण करण्यासाठी असलेली समिती सक्षम नसल्याचे आढळले आहे. तसेच या कार्यालयात महिला सुरक्षेशी संबंधित नियमांचे कोणतेही फलक किंवा पोस्टर्स लावण्यात आलेले नव्हते. कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे अनेक ठिकाणी बंद अवस्थेत असल्याचेही निरीक्षणात नोंदवण्यात आले आहे.

आयोगाचे कडक निर्देश

यावेळी अनेक कर्मचारी हे तक्रार केली तर नोकरी जाईल, अशा दबावाखाली वावरत असल्याचे आयोगाने म्हटले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत, दोषींवर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच, ज्या महिलांनी धाडसाने तक्रार केली आहे, त्यांना साक्षीदार संरक्षण (Witness Protection) देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. एका मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसच्या आड महिलांचे शोषण होत असल्याच्या या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.

निदा खानला अटक

नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत धर्मांतराचे रॅकेट चालवल्याचा आरोप असलेली निदा खान ही गेल्या काही दिवसांपासून फरार होती. छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरात असलेल्या एका इमारतीतून पोलिसांनी तिला अटक केली. ही इमारत आणि ज्या ठिकाणी तिला लपवण्यात आले होते, ते घर एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी मतीन पटेल यांच्यावर गुन्हा दाखल केला. यानतंरच्या चौकशीत महानगरपालिकेने त्यांच्या मालमत्तांची तपासणी सुरु केली आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?