धक्कादायक; शिक्षकाकडून पाकिस्तान जिंदाबादची घोषणा; 14 ऑगस्ट पाकिस्तान स्वातंत्र्यदिनाचा लावला स्टेटस; शाळेतून केली हकालपट्टी

जावेद अहमदन याआधीही आपल्या मोबाईलमध्ये 5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीर ब्लॅक डे असा असा स्टेटस ठेवला होता. त्यावेळी त्यांच्या शिक्षकांच्या ग्रुपमधील अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते, त्यामुळे पोलिसांनी आता जावेद अहमदला ताब्यात घेऊन कसून चौकशीला सुरुवात केली असून शाळेतून मात्र त्याची हाकलपट्टी केली आहे.

धक्कादायक; शिक्षकाकडून पाकिस्तान जिंदाबादची घोषणा; 14 ऑगस्ट पाकिस्तान स्वातंत्र्यदिनाचा लावला स्टेटस; शाळेतून केली हकालपट्टी
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 10:53 AM

कोल्हापूरः भारतात सर्वत्र 15 ऑगस्ट दिवशी (independence day) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतानाच कोल्हापुरात मात्र एक धक्कादायक प्रकार घडला. 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन (Independence Day of Pakistan) असतो, मात्र आंतराष्ट्रीय पातळीवर भारत आणि पाकिस्तानचे संबंध तणावपूर्ण असतात. त्यापार्श्वभूमीव देशातही अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवले आहेत. असाच प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात घडला आहे. मोबाईलवर पाकिस्तान जिंदाबाद असा स्टेटस (WhatsApp Status) लावलेल्या एका शिक्षकांवर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याची शाळेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. सध्या त्या शिक्षकाला मात्र पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो शिक्षक जम्मूचा असल्याचे सांगण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथ राहणाऱ्या जावेद अहमद (मूळ राहणार जम्मू) या शिक्षकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याचा कसून चौकशी करण्यात येत आहे.

चौकशीसाठी घेतले ताब्यात

हातकणंगले तालुक्यातील एका खासगी शाळेत हा शिक्षक म्हणून नोकरी करत होता. मात्र 14 ऑगस्ट रोजी जावेद अहमदने आपल्या मोबाईलमध्ये व्हाटसअपला पाकिस्तान जिंदाबादचा स्टेटस ठेवला होता. जावेद अहमद याचा स्टेटस शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाहिल्यानंतर शिक्षकाची चौकशी करण्याची मागणी करण्यता आली.

पाकिस्तान जिंदाबादचा स्टेटस

शिक्षकाने पाकिस्तान जिंदाबाद असा स्टेटस ठेवल्यानंतर तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला त्यानंतर याप्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुख व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्या शिक्षकाला ताब्यात घेऊन चौकशीला सुरूवात केली. याप्रकरणी स्थानीक पोलीस मात्र अनभिज्ञच असल्याचे सांगण्यात आले. कारण जिल्हा पोलीस प्रमुखांकडून कारवाई झाली तरीही स्थानीक पोलिसांना या घटनेची खबरबात नव्हती.

शिक्षकाचा ब्लॅक डे

जावेद अहमदन याआधीही आपल्या मोबाईलमध्ये 5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीर ब्लॅक डे असा असा स्टेटस ठेवला होता. त्यावेळी त्यांच्या शिक्षकांच्या ग्रुपमधील अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते, त्यामुळे पोलिसांनी आता जावेद अहमदला ताब्यात घेऊन कसून चौकशीला सुरुवात केली असून शाळेतून मात्र त्याची हाकलपट्टी केली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.