AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

School Fee Issue : उल्हासनगरच्या न्यू इरा प्रायमरी शाळेत पालकांचा गोंधळ, फी वाढीविरोधात नागरिक संतप्त

कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष शाळा बंद होत्या. आता नियमित शाळा सुरू होत असल्याने पालक जेव्हा शाळेत आले होते, तेव्हा 18 हजार रुपये असलेली फी 30 हजार रुपये झाल्याचे शाळेकडून सांगण्यात आले. तसेच ही फी एकदम एकदाच भरावी असं पालकांना सांगण्यात आलं. त्यामुळे सर्व पालकांनी शाळेत गोंधळ घातला.

School Fee Issue : उल्हासनगरच्या न्यू इरा प्रायमरी शाळेत पालकांचा गोंधळ, फी वाढीविरोधात नागरिक संतप्त
उल्हासनगरच्या न्यू इरा प्रायमरी शाळेत पालकांचा गोंधळImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jun 14, 2022 | 12:44 AM
Share

उल्हासनगर : उल्हासनगरच्या न्यू इरा प्रायमरी शाळेत पालकां (Parents)नी सोमवारी प्रचंड गोंधळ घातला. विद्यार्थ्यांची यावर्षीची शाळेची फी (School Fee) दुपटीने वाढवल्याबद्दल पालक शाळेत जमले होते. तसेच ही फी एकदम भरावी असेही शाळा व्यवस्थापनाकडून सांगण्यात आल्याने पालक संतप्त झाले. आधीच कोरोनाने कंबरडे मोडले आहे. अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काही अजून बेरोजगार आहेत तर काही तुटपुंज्या पगारावर तडजोड केली आहे. अशातच शाळेने दुप्पट फी (Double Fee) केल्याने पालकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. शिवसेनेचे उपशहरप्रमुख संदीप गायकवाड, शिवसेना शहर युवा सचिव आणि पोलीस यांनी मध्यस्थी करुन तूर्तास तोडगा काढला आहे. मात्र शाळेने दिलेला शब्द न पाळल्यास शाळेबाहेर ठिय्या आंदोन करण्यात येईल, असा इशारा संदीप गायकवाड यांनी दिला आहे.

पालकांना तीन इंस्टॉलमेंटमध्ये फी भरण्यास मुभा

कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष शाळा बंद होत्या. आता नियमित शाळा सुरू होत असल्याने पालक जेव्हा शाळेत आले होते, तेव्हा 18 हजार रुपये असलेली फी 30 हजार रुपये झाल्याचे शाळेकडून सांगण्यात आले. तसेच ही फी एकदम एकदाच भरावी असं पालकांना सांगण्यात आलं. त्यामुळे सर्व पालकांनी शाळेत गोंधळ घातला. या गोंधळामुळे पोलिसांना बोलाविण्यात आले. उल्हासनगर शिवसेनेचे उपशहरप्रमुख संदीप गायकवाड आणि शिवसेना शहर युवा सचिव आणि पोलीस यांनी पालकांतर्फे शाळेच्या प्रिंसिपल यांच्यासोबत चर्चा केली. चर्चेत अंतिम निर्णय घेण्यात आला की, ज्या पालकांना एकदम फी भरण्याची ऐपत नाही, अशा पालकांना तीन इंस्टॉलमेंटमध्ये फी भरण्यास मुभा देण्यात यावी.

तसेच कोरोना काळात ज्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले, त्यांना पुढच्या वर्गात बसविण्यात यावे. यासाठी पालकांनी शाळेत विनंती अर्ज केल्यास ती विनंती आम्ही पूर्ण करू असं शाळेच्या मुख्याध्यापिकांनी म्हटलं आहे. मात्र पालकांनी विनंती अर्ज केल्यावरच त्या त्या समस्येवर विचार केला जाईल, असं मुख्याध्यापिकांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान, पालकांच्या समस्यांचं तूर्तास समाधान केलं गेलं असलं तरी शाळेने म्हटल्याप्रमाणे पालकांना सहकार्य न केल्यास शाळेत ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे उपशहरप्रमुख संदीप गायकवाड यांनी केला आहे. (Parents angry over double fees at New Era Primary School in Ulhasnagar)

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!