आसाममध्ये Encounter! 7 वर्षांच्या मुलीचा बलात्कार करुन हत्या, संशयित आरोपी पोलिसांच्या गोळीबारात ठार

Assam Encounter : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी अडीच वाजण्याच्या सुमारास राजेश मुंडा यांना क्राईम सीनसाठी जिथं गुन्हा घटला, त्या ठिकाणी नेण्यात येत होतं. तेव्हा पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न राजेशनं केला.

आसाममध्ये Encounter! 7 वर्षांच्या मुलीचा बलात्कार करुन हत्या, संशयित आरोपी पोलिसांच्या गोळीबारात ठार
चोवीस तासांच्या आत आसाममध्ये दुसरा एन्काऊटंरImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 4:17 PM

आसाममध्ये पोलिसांच्या गोळीबारात बलात्कारप्रकरणातील (Rape accused) आरोपी ठार झाला आहे. बलात्कार आणि हत्याप्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर (Assam Police Encounter) करण्यात आला आहे. आसामच्या उदलगुरी जिल्ह्यातील स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 38 वर्षांच्या आरोपीला पोलिसांनी यमसदनी धाडलंय. एन्काऊन्टर करण्यात आलेल्या आरोपीनं 7 वर्षांच्या मुलीचा बलात्कार करुन हत्या केल्याचा आरोप होता. चोवीस तासांच्या आत आसाम पोलिसांनी (Assam Police) केलेली ही दुसरी कारवाई आहे. याआधी पोलिसांनी मंगळवारी रात्री 16 वर्षांच्या मुलीसोबत अतिप्रसंग करणाऱ्याचाही एन्काऊन्टर केला होता. या दोन्ही घटनांनी आसाममधील एन्काउन्टरची संख्या वाढली असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, 10 मार्च रोजी एका सात वर्षांच्या मुलीचा बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आलाचं प्रकरण समोर आलं होतं. याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी चौकशीनंतर मंगळवारी राजेश मुंडा या संशयित आरोपीला पकडलं होतं. एका फॅक्टरीतून संशयित आरोपी राजेशला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

गोळीबार करण्याची वेळ का आली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी अडीच वाजण्याच्या सुमारास राजेश मुंडा यांना क्राईम सीनसाठी जिथं गुन्हा घटला, त्या ठिकाणी नेण्यात येत होतं. तेव्हा पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न राजेशनं केला. पोलिसांच्या पथकानं सुरुवातीच्या प्रयत्न त्याला रोखण्यासाठी गोळीबार केली. या गोळीबारात तो जखमी झाला होता. जखमी अवस्थेत असलेल्या संशयित आरोपीला उपचारासाठी रुग्णालयातही घेऊन जाण्यात आलं होतं. मात्र तिथं त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

8 महिन्यांत तब्बल 28 एन्काऊंटर

आसाममध्ये हेमंत बिस्वा सरमा मुख्यमंत्री बनल्यापासून एन्काऊटंरचं प्रमाण लक्षणीय प्रमाणात वाढलंय. आसाममध्ये मे महिन्यात भाजप सरकारचं नेतृत्तव हेममंत बिस्वा सरमा यांच्याकडे देण्यात आलं होतं. तेव्हापासून एन्काऊन्टरचं प्रमाण वाढलं असल्याचं आकडेवारीतून समोर आलंय. पोलिसांनी जानेवारीपासून आपला आक्रपणपणा अधिकच प्रखर केला आहे. मे महिन्यापासून जानेवारीपर्यंत 28 जण एन्काऊंटरमध्ये मारले गेलेत. वाढलेल्या एन्काऊटरवरुन आसामचं राजकारणही ढवळून निघालंय. पोलिसांनी केलेल्या कारवाईतील अनेक एन्काऊंटर हे बोगस असल्याचा आरोपही केला जातोय.

धक्कादायक आकडेवारी!

आरिफ जवादर यांनी याबाबत गुवाहाटी हायकोर्टात याचिकाही दाखल केली आहे. 2021 पासून एन्काऊटर वाढले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मे 2021पासून हे प्रमाण वाढल्याचा त्यांनी दावा केलाय. 10 मे 2021 पासून 28 जानेवारी 2022 पर्यंत आसामध्ये 28 जण एन्काऊंटरमध्ये मारले गेलेत, तर 73 जण जखमी झाले असल्याची आकडेवारीही समोर आली आहे.

संबंधित बातम्या :

Nashik Crime | नाशिकमध्ये ओली Party करणारे Police निलंबित; आमदारांच्या भेटीनंतर कारवाई

वाशिममध्ये दोन मोटारसायकल समोरासमोर भिडल्या, अपघातात शिक्षक ठार, दोन जण गंभीर 

Pune Crime | अखेर न्याय मिळाला ! आंबेगावमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला 20 वर्षांचा सश्रम कारावास

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.