इराणचा डोनाल्ड ट्रम्प यांना जबर हादरा, सर्वात जवळचे दोन मित्र देश फोडले, अमेरिकेचा मोठा गेम

युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर इराणने हा मार्ग पुन्हा सुरू करावा यासाठी ट्रम्प यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, मात्र आता ट्रम्प यांना एक मोठा धक्का बसला आहे.

इराणचा डोनाल्ड ट्रम्प यांना जबर हादरा, सर्वात जवळचे दोन मित्र देश फोडले, अमेरिकेचा मोठा गेम
Donald Trump
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 21, 2026 | 9:49 PM

युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मूजची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला. इराणने होर्मूजची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जगभरात मोठं इंधन संकट निर्माण झालं आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जगाला जेवढ्या प्रमाणात कच्च्या तेलाची गरज आहे, त्यातील सुमारे 25 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक याच मार्गाने होते . दरम्यान जगभरात इंधन टंचाई निर्माण झाल्यानं आता अमेरिकेवर देखील दबाव वाढला आहे. त्यामुळे अमेरिकेकडून होर्मूजची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमेरिकेकडून या विरोधात आंतरराष्ट्रीय स्थरावर एक मोठी सैन्य आघाडी उघडण्याची तयारी सुरू आहे. मात्र अमेरिकेला आता इराणने मोठा धक्का दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या दोन देशांना इराणकडून मोठी ऑफर देण्यात आली आहे. या देशांचं मन वळवण्यात इराणला यश आलं आहे. इराणकडून ऑफर मिळाल्यामुळे आता हे दोन्ही देश होर्मूज सामुद्रधुनी इराणने पुन्हा सुरू करावी यासाठी ट्रम्प तयार करत असलेल्या प्लॅनमध्ये सहभागी होण्याची खूपच कमी शक्यता आहे. इराणकडून दक्षिण कोरिया आणि जपानला होर्मूज बंदरातून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील प्रमुख देशांना होर्मूज मार्ग पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी आपल्या युद्धनौका या ठिकाणी तैनात कराव्यात असे आवाहन केले होते. नाटो देशांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा हा प्रस्ताव आधीच फेटाळून लावला आहे. दुसरीकडे जपान आणि दक्षिण कोरियाचा या कारवाईत ट्रम्प यांना साथ देण्याचा विचार चालू होता, मात्र आता इराणने जपान आणि दक्षिण कोरियाला देखील या मार्गाने जाऊ देण्याचा निर्णय घेतल्यानं जपान आणि दक्षिण कोरिया देखील ट्रम्प यांच्या या कारवाईमध्ये सहभागी होण्याची शक्यता नाहीये, हा ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आमच्या मित्र राष्ट्रासाठी हा मार्ग खुलाच आहे, असं इराणने म्हटलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us