उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, महत्त्वाच्या नेत्याने केला शिंदे गटात प्रवेश; राजकीय गणित बदलणार!

सध्या निवडणुकीचा हंगाम नसला नाहीये. परंतु तरीदेखील आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जबर धक्का दिला आहे. एका महत्त्वाच्या नेत्याने ठाकरे गट सोडून थेट शिंदे गटात प्रवेश केला आहे.

| Updated on: May 12, 2026 | 8:00 PM
1 / 5
निवडणूक असो किंवा नसो राज्यात नेहमीच कुठेतरी राजकीय उलथापालथ होत असते. नेहमीच एखादा नेता तुम्हाला पक्षबदल करताना दिसतो. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तर अनेक बड्या नेत्यांनी आपली राजकीय सोय पाहून पक्षबदल केला.

निवडणूक असो किंवा नसो राज्यात नेहमीच कुठेतरी राजकीय उलथापालथ होत असते. नेहमीच एखादा नेता तुम्हाला पक्षबदल करताना दिसतो. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तर अनेक बड्या नेत्यांनी आपली राजकीय सोय पाहून पक्षबदल केला.

2 / 5

दोन्ही शिवसेनांनी एकमेकांचे नेते फोडले. सध्या निवडणुकीचा हंगाम नसला नाहीये. परंतु तरीदेखील आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जबर धक्का दिला आहे. एका महत्त्वाच्या नेत्याने ठाकरे गट सोडून थेट शिंदे गटात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या पक्षप्रवेशावेळी खासदार श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते.

3 / 5

मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगरमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तेजस सांगळे आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यासह शीळफाट्यातील आव्हाडांच्या राष्ट्रवादीचे विभाग अध्यक्ष गणेश मुंढे आणि निकिता मुंढे यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

4 / 5

सोबतच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनीही शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी तसेच ठाकरे गटातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्याने अंबरनाथ येथील राजकीय गणित बदलले आहे.

5 / 5

या भागात शिंदे यांच्या शिवसेनेचे बळ वाढले आहे. त्याचा आगामी काही निवडणुकांत फायदा होणार आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाला मात्र पक्षवाढीसाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us