45 व्या वर्षीही 25 ची कशी दिसते श्वेता तिवारी? फिटनेस सिक्रेट समोर, रात्री करते हे एक काम
45 व्या वर्षी देखील एकदम फिट आणि सौंदर्यामध्ये तरुण मुलींसारखी दिसणाऱ्या श्वेता तिवारीचं फिटनेस रहस्य काय? ऐकून तुम्ही देखील व्हाल चकित.

तिच्या फिटनेसचे रहस्य नेमके काय, याबद्दल सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगताना दिसत आहे. एकेकाळी टीव्ही मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली श्वेता तिवारी आजही तितकीच फिट आणि फ्रेश दिसते. तिच्या चेहऱ्यावरचा ग्लो, स्लिम फिगर आणि एनर्जी पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करतात.

मात्र, तिच्या फिटनेसचे रहस्य कोणत्याही महागड्या डाएटमध्ये नसून साध्या आणि संतुलित जीवनशैलीत दडलेले आहे. श्वेता तिवारीच्या डाएटमध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे तिचे रात्रीचे जेवण. अनेक लोक रात्री जंक फूड किंवा तेलकट पदार्थ खाणे पसंत करतात, पण श्वेता मात्र रात्रीच्या जेवणात साधी देसी खिचडी खाणे पसंत करते.

अनेकांना आजारी माणसांचे अन्न वाटणारी खिचडी आता फिटनेससाठी सुपरफूड मानली जात आहे. इतिहासातही खिचडीचे महत्त्व अधोरेखित झालेले दिसते. प्रसिद्ध मुगलकालीन ग्रंथ ‘आइन-ए-अकबरी’मध्ये बादशाह अकबरलाही खिचडी आवडत असल्याचा उल्लेख आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्री खिचडी खाल्ल्याने पचनसंस्था हलकी राहते. तांदूळ आणि डाळींपासून बनणारी खिचडी ही फायबर, प्रोटीन आणि आवश्यक पोषक घटकांनी भरलेली असते. ती पचायला सोपी असल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

मात्र, श्वेता तिवारीची फिटनेस केवळ आहारावर अवलंबून नाही. नियमित व्यायामही तिच्या दिनचर्येचा महत्त्वाचा भाग आहे.

ती दररोज कार्डिओ, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि योगा यांचा समतोल साधत वर्कआउट करते. त्यामुळे वाढत्या वयातही श्वेता तिवारी यांची फिटनेस आणि एनर्जी कायम असल्याचे दिसून येते.