Truecaller ला BSNL ची टपली, आली नवीन टेक्नॉलॉजी, लवकरच सुरू होणार नवीन सेवा
BSNL New Service: प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत अनेक जणांची मोबाईलवरून फसवणूक करण्यात येते. ट्रूकॉलरच्या मदतीने आपण असे कॉलर ओळखू शकतो. पण आता बीएसएनएल या सरकारी दूरसंचार कंपनीने एक पाऊल पुढे टाकले आहे.

सध्या मोबाईलवर येणार्या अनोळखी कॉलने अनेकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यात प्रमोशन, बँकिंगच्या नावाखाली, कर्ज आणि स्कीमच्या नावाखाली गंडा घालणारे कॉल वाढले आहेत. अशावेळी अनोळखी क्रमांक आला की अनेक जण तो कॉल उचलत नाही. पण आता बीएसएनएलने नवीन तंत्रज्ञान आणले आहे.

सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड, BSNL ने एक खास तंत्रज्ञान समोर आणले आहे. त्यामुळे अनोळखी आणि फसवणूक करणारे कॉल आता ओळखता येणार आहे. ग्राहकांची फसवणूक टाळता येणार आहे. TRAI ने गेल्या काही दिवसांपासून कंपन्यांवर दबाव वाढवल्याने स्पॅम कॉल, मॅसेजचे प्रमाण कमी झाले आहे.

बीएसएनएल लवकरच CNAP (Caller Name Presentation) सेवा सुरू करत आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर युझर्सचा कॉल आल्यानंतर त्या व्यक्तीचे नाव आपोआप झळकेल. ते नाव कॉल येताच समोर येईल. कॉलरच्या मोबाईलमध्ये तो नंबर सेव्ह नसला तरी हे नाव दिसेल .

याविषयीचे वृत्त आता समोर येत आहे. भारतीय संचार निगम लिमिटेडने ही सेवा सुरू करण्यासाठी अगोदरच तयार सुरू केली होती असे समोर येत आहे. सध्या कंपनी विविध विभागात या सेवेसाठी एकिकृत धोरण राबवण्याची तयारी करत आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागेल.

एका अंदाजानुसार संपूर्ण देशात सेवा सुरू करण्यासाठी एकत्रीकरण करण्यासाठी अजून 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर CNAP सेवा सुरू करण्यात येईल. खास गोष्ट म्हणजे खासगी टेलिकॉम कंपन्या , रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांनी यापूर्वीच ही सेवा सुरू केली आहे.

गेल्या काही महिन्यात स्पॅम कॉल, खोटे बँकिंग कॉल, विमा कॉल आणि डिजिटल फसवणुकीचे गुन्हे वाढले होते. अनेक प्रकरणात लोकांना डिजिटल अरेस्ट करण्यात आले होते. पैशांसाठी असे प्रकार करण्यात येत होते. टेलिकॉम सेक्टरमधील तज्ज्ञांच्या मते, अशा बोगस कॉलचा लवकर पर्दाफाश झाला तर लोकांची फसवणूक टळेल.