
द केरळ स्टोरी हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. अनेक लोकांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. चित्रपट रिलीज झाल्यानंतरही चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे.

पश्चिम बंगालमधील सरकारने या चित्रपटावर राज्यात बंदी घालण्याचा थेट निर्णय घेतला आहे. तामिळनाडूमध्येही चित्रपटावर बंदी आहे. सतत या चित्रपटाला विरोधात होताना दिसत आहे.

आता द केरळ स्टोरी चित्रपटाच्या वादावर बाॅलिवूड अभिनेत्री अनुपम खेर यांनी मोठे भाष्य केले आहे. अनुपम खेर म्हणाले की, जे द कश्मीर फाईल्स या चित्रपटाला विरोध करत होते तेच लोक आता द केरळ स्टोरीला विरोध करताना दिसत आहेत.

पुढे अनुपम खेर म्हणाले की, मला या गोष्टीचा आनंद आहे की, असे चित्रपट तयार केले जात आहेत जे सत्याच्या जवळपास आहेत. फक्त चित्रपट वेगळे आहेत, मात्र विरोध करणारे चेहरे एकच आहेत.

काही दिवसांपूर्वीच विवेक अग्निहोत्री यांनी देखील सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत द केरळ स्टोरी या चित्रपटाला सपोर्ट केला होता. तसेच चित्रपटाच्या टिमला मोठा इशारा देखील दिला होता.