Dhurandhar : ‘धुरंधर’चा सर्वांत मोठा कारनामा, बॉक्स ऑफिसवर नोटांचा वर्षाव; शाहरुख-प्रभासलाही पछाडलं

'धुरंधर' फ्रँचाइजीमधल्या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. रणवीरने या चित्रपटांमुळे शाहरुख खान आणि प्रभास यांनाही पछाडलं आहे. आदित्य धर दिग्दर्शित या दोन्ही चित्रपटांनी मिळून किती कमाई केली, ते जाणून घ्या..

| Updated on: May 14, 2026 | 3:13 PM
1 / 5
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर'च्या फ्रँचाइजीने अभिनेता रणवीर सिंहचं नशीब पूर्णपणे पालटलं आहे. 'धुरंधर' आणि 'धुरंधर : द रिव्हेंज' या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. या दोन्ही चित्रपटांमुळे रणवीर सिंहचं नशीब चमकलं आहे.

2 / 5
कोविड महामारीनंतर रणवीर सिंहचे '83', 'जयेशभाई जोरदार', 'सर्कस' हे चित्रपट फ्लॉप झाले होते. तर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाने चांगली कामगिरी केली होती. परंतु आता 'धुरंधर' आणि 'धुरंधर 2'ने संपूर्ण खेळच बदलला आहे. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 3700 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे.

3 / 5
रणवीर सिंहने याबाबतीत शाहरुख खान आणि प्रभास यांनाही मागे टाकलं आहे. कोविडनंतरच्या शाहरुखच्या चित्रपटांनी 2704.07 कोटी रुपये आणि प्रभासच्या चित्रपटांनी 2393.29 कोटी रुपये कमावले होते. रणवीरच्या 'धुरंधर'ने 1354.84 कोटी रुपये आणि 'धुरंधर 2'ने आतापर्यंत 1833.56 कोटी रुपये कमावले आहेत.

4 / 5
रणवीर सिंहच्या '83' या चित्रपटाने 184.36 कोटी रुपये, जयेशभाई जोरदारने 24.1 कोटी रुपये आणि सर्कसने फक्त 39.6 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाने 348.89 कोटी रुपयांची कमाई केली होती. आता धुरंधर फ्रँचाइजीच्या दमदार यशानंतर रणवीर बॉलिवूडमधील सर्वाधिक मागणी असलेला अभिनेता ठरला आहे.

5 / 5
'धुरंधर 2' हा चित्रपट मार्च महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अजूनही या चित्रपटाची कमाई सुरूच असून आमिर खानच्या 'दंगल'ला मागे टाकण्यापासून फक्त काही पावलं दूर आहे. 'दंगल'ने जगभरात 2000 कोटी रुपयांची कमाई केली होती.

Follow Us