कष्ट करुनही पगारवाढ मिळत नाही, मग ऑफिसच्या टेबलावरून आजच हटवा या वस्तू

ऑफिसमध्ये कष्ट करूनही यश मिळत नसेल तर तुमच्या डेस्कची वास्तू तपासा. प्रमोशन आणि सकारात्मक ऊर्जेसाठी डेस्कवर कोणत्या गोष्टी ठेवाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात, याबद्दल सविस्तर माहिती येथे वाचा.

| Updated on: May 13, 2026 | 3:29 PM
1 / 6
जर तुम्हाला नोकरीमध्ये कठोर परिश्रम करूनही अपेक्षित यश किंवा प्रमोशन मिळत नसेल, तर त्याचे कारण तुमचा ऑफिसचा डेस्क असू शकते. वास्तुशास्त्रानुसार, आपण जिथे सर्वाधिक वेळ घालवतो, त्या जागेच्या ऊर्जेचा थेट परिणाम आपल्या निर्णयक्षमतेवर आणि प्रगतीवर होतो.

2 / 6
ऑफिसमध्ये ८-९ तास घालवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी डेस्कची मांडणी अत्यंत महत्त्वाची ठरते. वास्तुशास्त्रानुसार, कामाच्या ठिकाणी जेवणाचे ताट ठेवणे अशुभ मानले जाते.

3 / 6
अनेकांना कामाच्या ओघात टेबलवरच जेवण्याची सवय असते. यामुळे मानसिक स्पष्टता कमी होते आणि एकाग्रतेत बाधा येते. शक्य असल्यास जेवणासाठी कॅन्टीन किंवा वेगळ्या जागेचा वापर करावा.

4 / 6
डेस्कवर शोभेसाठी कॅक्टस (निवडुंग) किंवा कोणतीही काटेरी झाडे ठेवू नका. वास्तूमध्ये अशी झाडे नकारात्मक ऊर्जा पसरवणारी मानली जातात. यामुळे ऑफिसमधील वातावरणात तणाव निर्माण होऊ शकतो आणि तुमच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो.

5 / 6
टेबलवर फायलींचा ढीग, जुनी विखुरलेली कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक तारांचा गुंता ठेवू नका. अस्ताव्यस्त डेस्कमुळे विचारांमध्ये गोंधळ निर्माण होतो. प्रगतीसाठी तुमचे वर्क-डेस्क नेहमी नीटनेटके आणि स्वच्छ असणे आवश्यक आहे.

6 / 6
वास्तुशास्त्रानुसार कासवाची छोटी मूर्ती डेस्कवर ठेवा. ही मूर्ती कामात स्थिरता आणते आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते. हत्ती हे बुद्धी आणि शक्तीचे प्रतीक आहे. डेस्कवर हत्तीची छोटी मूर्ती ठेवल्याने एकाग्रता वाढते आणि पदोन्नतीच्या संधी निर्माण होतात.

Follow Us