
ज्योतिष शास्त्रात, सूर्य-शनीच्या युतीला फार प्रभावशाली असल्याचं म्हटलं जातं.सूर्य-शनि ग्रहाच्या युतीमुळे लाभदायक संयोग तयार होतो तेव्हा त्याचा फायदा काही राशींना होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, 22 मे रोजी सूर्य-शनीचा लाभ दृष्टी योग 6 राशीसाठी शुभ असणार आहे. त्या 6 राशी कोणत्या आहेत? जाणून घेऊयात. (Photo Credit : Tv9)

सूर्य-शनि लाभ दृष्टी योग मेष राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार असं म्हटलं जात आहे. सूर्य-शनिच्या या योगाच्या सकारात्मक प्रभावामुळे मेष राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होती. तलेच व्यवसायात आर्थिक भरभराट होण्याची चिन्हं आहेत. या योगामुळे नोकरदार वर्गाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. पगारवाढ होऊ शकते. भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीतून आर्थित स्थिती सुधारु शकते. रखडलेली कामं पूर्ण होतील. (Photo Credit : Tv9)

सूर्य-शनि योगामुळे सिंह राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. सिंह राशीच्या लोकांची व्यवसायात भरभराट होऊ शकते. तसेच नोकरदार वर्गाला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. दररोजच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. (Photo Credit : Tv9)

तूळ राशीच्या लोकांना प्रवासातून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होऊ शकतो. शनि आणि रवी ग्रहाची विशेष कृपा राहिल. अनेक महिन्यांपासून रखडलेली कामं पूर्ण होतील. कुटुंबात आनंदीआनंद राहिलं. (Photo Credit : Tv9)

धनु राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये सूर्य-शनी युतीमुळे सकारात्मक बदल होतील. व्यवसायात आर्थिक भरभराट दिसेल. नोकरदार वर्गाला चांगल्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळू शकते. कार्यालयात वरिष्ठाचं सहकार्य लाभेल. प्रमोशनचा मार्ग मोकळा होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. (Photo Credit : Tv9)

शनि-रवीचा लाभ योग मकर राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे. या काळात नोकरीसह व्यवसायात आर्थिक लाभ मिळवण्याची संधी मिळेल. व्यवसायानिमित्ताने विदेश दौरा करण्याची संधी मिळेल. (Photo Credit : Tv9)

कुंभ राशीच्या लोकांना नोकरीत प्रमोशन मिळेल. पगारवाढ मिळेल, अशी आशा ठेऊ शकता. नोकरदार वर्गाला आनंदाची बातमी मिळू शकते. व्यावसायिकांना जोरदार कमाई करण्याची संधी मिळेल. (Photo Credit : Tv9) (Disclaimer: वरील माहिती ही सामान्य मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्ठी करत नाही.)