जाने कहाँ गये वो दिन… फॅमिलीसोबत फोटो शेअर करत सचिनचा जुन्या आठवणींना उजाळा

भारतासह जगातील सर्वांत महान क्रिकेटर म्हणून सचिन तेंडूलकर याला ओळखले जाते.

1/5
Sachin Tendulkar
'सचिन रमेश तेंडूलकर' जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात गाजलेलं नाव. भारताचा माजी खेळाडू 'सचिन जेव्हा खेळायचा तेव्हा देश थांबायचा' असं म्हटलं जात. याच सचिनने आज जागतिक पालक दिनानिमित्त आपल्या पालकांचा फोटो टाकून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. (Sachin Tendulkar Wishes Global Day of Parents With posting Photo on Instagram)
2/5
sachin insta
सचिनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फार वर्षांपूर्वीचा एक फोटो टाकला आहे. ज्यात तो त्याचे आई-वडील आणि भावंडासोबत बसलेला दिसत आहे. या फोटोला त्याने एक कॅप्शन देखील दिलं आहे. ज्यात त्याने आई वडिलांनी त्याच्यासाठी आणि भावंडासाठी जे काही केलं त्यासाठी त्यांचे आभार मानले आहेत.
3/5
sachin mother father
सचिनच्या वडिलांच नाव रमेश तेंडूलकर असून ते किर्ती महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून काम करत. तर आई रजनी ही गृहिणी आहे.
4/5
sachin sibling
सचिनला दोन मोठे भाऊ असून नितिन तेंडूलकर आणि अजित तेंडूलकर अशी त्या दोघांची नावे आहेत. सचिनला एक मोठी बहिण देखील आहे सविता तेंडूलकर असं तिच नाव असून तिनेच सचिनला पहिली बॅट दिली असल्याचा उल्लेख सचिनने अनेकदा केला आहे.
5/5
sachin family
सचिनच्या पत्नीचं नाव अंजली तेंडूलकर असं आहे. सचिनला एक मुलगा आणि एक मुलगी असून अर्जून आणि सारा अशी त्यांची नावे आहेत. सचिनचा मुलगा अर्जून क्रिकेटपटू असून मुंबई इंडियन्सने IPL 2021 मध्ये त्याला संघात विकत घेतलं.