Sujay Vikhe Patil | फडणवीस-मोदींनी कारवाई केली तरी चालेल, शिवसेनेशी एकनिष्ठ राहणार, भाजपचे खासदार सुजय विखे पाटलांचं वक्तव्य !

नगर जिल्ह्यातील शिवसेनेचं कौतुक केलं. ते म्हणाले, ' राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यसभेच्या निकालावरून ते पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ठाकरे यांनी वेळीच सावध रहावे.'

Sujay Vikhe Patil | फडणवीस-मोदींनी कारवाई केली तरी चालेल, शिवसेनेशी एकनिष्ठ राहणार, भाजपचे खासदार सुजय विखे पाटलांचं वक्तव्य !
भाजपा खासदार सुजय विखे पाटील
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 6:21 PM

अहमदनगर | महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेत तीव्र मतभेद असले तरीही अहमनदनगरच्या भाजपाच्या खासदाराने केलेलं वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेत आहे. राज्याती कशीही स्थिती असली तरीही नगर जिल्ह्यात आपण शिवसेनेसोबतच राहणार आहोत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) किंवा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कारवाई केली तरी चालेल, असं वक्तव्य सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी एका कार्यक्रमात केलं. या कार्यक्रमाला नगर जिल्ह्यातील भाजप, शिवसेना आणि इतर पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना उद्धव ठाकरे सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसपासून सावध राहण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

‘मी निवडून येण्यात शिवसेनेचा 50 टक्के वाटा’

पारनेर तालुक्यातील एका पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात सुजय विखे पाटील बोलत होते. यावेळी ते म्हणाले, मी खासदार म्हणून निवडून येण्यात 50 टक्के वाटा येथील शिवसेनेचा आहे. याची मला जाणीव आहे. त्यामुळेच गेल्या तीन वर्षांच्या काळात मी कधीही शिवसेनेच्या विरोधात बोललो नाही. मातोश्रीच्या विरोधात, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधातही मी कधी बोललो नाही. माझे काही कार्यकर्ते शिवसेनेत गेले. मला याची खंत वाटली नाही. केवळ पारनेर तालुकाच नव्हे संपूर्ण जिल्ह्यातच भाजप आणि पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेशी एकनिष्ठ राहील. शिवसेनेवर संकट येईल तेव्हा नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांना मी एकटं सोडणार नाही, यावर देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारवाई केली तरीही चालेल. असे बोलण्याची हिंमत ठेवणारा मी एकमेव भाजप खासदार आहे. यावर शिवसेनेची काय भूमिका असेल, हे सांगता येत नाही; असं वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केलं.

‘शिवसेनेला संपवण्याचा राष्ट्रवादीचा डाव’

राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे नाव न घेता सुजय विखे पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली. तसंच नगर जिल्ह्यातील शिवसेनेचं कौतुक केलं. ते म्हणाले, ‘ राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यसभेच्या निकालावरून ते पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ठाकरे यांनी वेळीच सावध रहावे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Non Stop LIVE Update
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.