सेनेने अद्याप प्रस्ताव दिलेला नाही, मात्र देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील

| Updated on: Nov 05, 2019 | 5:40 PM

भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP core committee meeting) यांनी याबाबतची माहिती दिली.

सेनेने अद्याप प्रस्ताव दिलेला नाही, मात्र देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील
Follow us on

मुंबई : भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP core committee meeting) यांनी याबाबतची माहिती दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील (BJP core committee meeting) यांनी व्यक्त केला.

“शिवसेनेने अद्याप कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. सेनेसोबत चर्चा करण्यासाठी भाजपची दारं 24 तास उघडी आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन होणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला आहे, त्याचा आदर ठेवून, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात लवकरात लवकर सरकार स्थापन होईल, याबाबत आमच्या मनात शंका नाही”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक झाली. सरकार स्थापन करण्याचा जनादेश महायुतीला  दिला आहे. शिवसेनेने कोणताही प्रस्ताव अद्याप दिला नाही. आमची दारं चर्चेसाठी उघडी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होईल, याबद्दल आमच्या मनात शंका नाही”.

भाजपची कोअर कमिटीच्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे उपस्थित होते.

“वर्षा बंगल्यावर भाजप महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक झाली. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, गिरीश महाजन होते. राज्याचा आढावा घेणारी ही बैठक होती. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुतीला सरकार स्थापन करण्यासाठी जनादेश दिला आहे. या जनादेशाचा आदर करुन, लवकरात लवकर आम्ही सरकार स्थापन करणार आहोत. शिवसेनेने अद्याप प्रस्ताव दिलेला नाही. तो प्रस्ताव लवकरात लवकर देताील. त्यावर चर्चा कऱण्यासाठी भाजपची दारं 24 तास उघडी आहेत. भाजप सर्वांना सोबत घेऊन जाणारं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन करण्यासाठी केंद्रीय नेतृत्त्वाचाही हिरवा कंदील आहे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आमचंच सरकार येणार. आम्ही सर्व नियोजन केलं आहे. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार. सरकार बनवण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. कोणत्याही क्षणी तुम्हाला गोड बातमी येऊ शकते. भाजपने आधी शिवसेनेला आपला प्रस्ताव पाठवला आहे. तो जाहीर सांगायचा नाही बैठकीत ठरलं आहे. आता शिवसेनेच्या प्रस्तावाची वाट पाहात आहे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.