विदर्भात भाजपला धक्का, राज्यमंत्री दर्जा असलेले किशोर तिवारी यांनी पक्ष सोडला

महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री दर्जा असेलेले, शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी (Kishor Tiwari left BJP) यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. किशोर तिवारी (Kishor Tiwari left BJP) आता शिवसेनेसाठी काम करणार आहेत.

विदर्भात भाजपला धक्का, राज्यमंत्री दर्जा असलेले किशोर तिवारी यांनी पक्ष सोडला

नागपूर : महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री दर्जा असेलेले, शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी (Kishor Tiwari left BJP) यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. किशोर तिवारी (Kishor Tiwari left BJP) आता शिवसेनेसाठी काम करणार आहेत.

“भाजपमध्ये मेगाभरती झाली, पण कचरा आला आहे. मुख्यमंत्री सोडल्यास भाजपचे नेते प्रामाणिकपणे काम करत नाहीत, मला विधानपरिषद आमदार करण्याचा शब्द भाजपने पाळला नाही. त्यामुळे भाजपपासून लांब जातोय, आता शिवसेनेसाठी काम करणार” असं शेतकरी नेते किशोर तिवारी म्हणाले.

शिवसेनेनं संधी दिल्यास मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या नागपूर दक्षिण – पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास आपण तयार आहोत, असंही किशोर तिवारी म्हणाले. काही दिवसापूर्वी ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ हे मातोश्रीवर आले होते, त्यावेळी किशोर तिवारी हे सुद्धा उपस्थित होते.

कृषीतज्ञ किशोर तिवारी यांनी उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे मंत्री-आमदारांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्गदर्शन केलं होतं. आपल्या भाषणात त्यांनी राज्य सरकारच्या शेतकरी धोरणांवर कठोर ताशेरे ओढले होते.

कोण आहेत किशोर तिवारी?

  • किशोर तिवारी हे राज्याच्या स्वाभिमानी शेतकरी मिशनचे अध्यक्ष आहेत
  • त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा आहे.
  • तिवारी हे संघाचे स्वयंसेवक आहेत
  • त्यांनी शेतकऱ्यांसाठी विदर्भात काम केलं आहे
  • आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने केली

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI