AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदीच काय, ट्रम्प आणले तरी माझा विजय कुणी रोखू शकत नाही : धनंजय मुंडे

उमेदवारी अर्ज भरल्यापासून भाजप (Parli Dhananjay Munde) उमेदवार दहशतीत आहेत, असं सांगत नरेंद्र मोदीच काय, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणलं तरी माझा विजय कोणी रोखू शकत नाही, असा दावा धनंजय मुंडेंनी केलाय.

मोदीच काय, ट्रम्प आणले तरी माझा विजय कुणी रोखू शकत नाही : धनंजय मुंडे
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Oct 12, 2019 | 5:22 PM
Share

बीड : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी परळीत येणार आहेत. परळीत (Parli Dhananjay Munde) भाजपकडून पंकजा मुंडे, तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे या दोघा भावंडात थेट लढत होत आहे. 17 तारखेला मोदी परळीमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ येत येतायत. तर दुसरीकडे 18 तारखेला याच परळीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा आहे. उमेदवारी अर्ज भरल्यापासून भाजप (Parli Dhananjay Munde) उमेदवार दहशतीत आहेत, असं सांगत नरेंद्र मोदीच काय, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणलं तरी माझा विजय कोणी रोखू शकत नाही, असा दावा धनंजय मुंडेंनी केलाय.

“उमेदवारी अर्ज दाखल करायच्या दिवसापासून भाजपने जो धसका घेतलाय, ते आणखी त्यातून बाहेर निघालेले नाहीत. त्यांना वाटलं की मोदी आल्याशिवाय आपल्याला कोणी वाचवू शकत नाही. हे कळाल्यावर मी भाजपच्या एका मोठ्या नेत्याला म्हणालो, मोदी मागच्या महिन्यात अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचाराला गेले होते. 17 ला मोदी येत आहेत, 19 ला ट्रम्प जरी आणले तरी विजय कुणीही रोखू शकत नाही अशी परिस्थिती आहे”, असं धनंजय मुंडे म्हणाले.

परळीत प्रतिष्ठेची लढत

पंकजा मुंडे राजकीय खेळी करण्यात आतापर्यंत धनंजय मुंडेंवर वरचढ ठरल्या असल्या तरी खऱ्या लढाईची प्रतिक्षा आहे. धनंजय मुंडेंनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करत भावनिक साद घालणं सुरु केलंय. तर पंकजा मुंडे दिवसभर राज्यभरातील भाजप उमेदवारांचा प्रचार करुन सायंकाळी परळीत स्वतःचा प्रचार करतात. धनंजय मुंडेही परळीत तळ ठोकून आहेत. त्यामुळे या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलंय.

पंतप्रधान मोदींची सभा

भाजपकडून राज्यात सभांचा धडाका सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परळीत 17 तारखेला सभा होईल. परळीतील मोदींच्या सभेची जय्यत तयारी सुरु आहे. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारासाठी ज्या मैदानात सभा घेतली होती, त्याच मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सभा होणार आहे. याच दिवशी राज्यात इतर ठिकाणीही ते सभा घेणार आहेत. मोदी रविवारपासून प्रचारसभांचा धडाका सुरु करतील. रविवारी राज्यातील तीन ठिकाणी त्यांची सभा होणार आहे.

Follow Us
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार