100 कोटी वसुलीत अनिल देशमुखांची भूमिका नसल्याचा सीबीआयचा अहवाल, मग कारवाई कुणाच्या इशाऱ्यावर? : सचिन सावंत

| Updated on: Aug 29, 2021 | 11:16 AM

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीवरुन राज्याच्या राजकारणाचा पारा पुन्हा चढलाय. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सीबीआयचे उपअधीक्षक आर एस गुंजाळ यांच्या चौकशी अहवालाची माहिती देत मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय.

100 कोटी वसुलीत अनिल देशमुखांची भूमिका नसल्याचा सीबीआयचा अहवाल, मग कारवाई कुणाच्या इशाऱ्यावर? : सचिन सावंत
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत,पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us on

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीवरुन राज्याच्या राजकारणाचा पारा पुन्हा चढलाय. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सीबीआयचे उपअधीक्षक आर एस गुंजाळ यांच्या चौकशी अहवालाची माहिती देत मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. सीबीआयच्या अहवालात अनिल देशमुख यांच्याविरोधात एकही पुरावा सापडला नसल्याचं म्हटलं. त्यानंतरही मग सीबीआयने कुणाच्या इशाऱ्यावर कारवाई केली? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केलाय. तसेच हे सर्व अनिल देशमुख आणि महाविकासआघाडीला बदनाम करण्याचं मोदी सरकारचं षडयंत्र असल्याचा आरोप करत याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी सचिन सावंत यांनी केलीय.

“सीबीआयच्या अधिकाऱ्यानेच चौकशी करुन अनिल देशमुखांची भूमिका नसल्याचं सांगितलं”

सचिन सावंत म्हणाले, “अनिल देशमुख आणि मविआला बदनाम करण्याचे मोदी सरकारचे षड्यंत्र उघड झाले आहे. प्राथमिक चौकशीत सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याने असा निष्कर्ष काढला होता की परमबीर सिंह यांनी केलेल्या तथाकथित 100 कोटी रुपये वसुली आरोपात अनिल देशमुख यांची कोणतीही भूमिका नाही आणि चौकशी बंद केली होती.”

“अहवाल बाजूला सारून सीबीआयनं कोणाच्या इशाऱ्यावर भूमिका बदलली?”

“तपास अधिकाऱ्याच्या अहवालाला बाजूला सारून सीबीआयने भूमिका कोणाच्या इशाऱ्यावर बदलली हे शोधण्यासाठी या षडयंत्राची सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन चौकशी व्हावी. उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशी करा असे सांगितले असताना न्यायालयाची दिशाभूल करून FIR नोंदवणे हा CBI चा मोठा गुन्हा आहे,” असा आरोप सचिन सावंत यांनी केला.

“गृहमंत्री अमित शहा यांनी जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा”

“गृहमंत्री अमित शहा यांनी जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. या यंत्रणा मोदी सरकारच्या विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी राजकीय शस्त्र कसे बनतात याचे हे स्पष्ट उदाहरण आहे. न्यायालयाची दिशाभूल केली जाते, नियम गुंडाळले जातात, चौकशा अंतहीन ठेवल्या जातात. अशी षड्यंत्रे फक्त हुकुमशाहीत घडतात. लोकशाही वाचवण्यासाठी संपूर्ण देश एकत्र येण्याची वेळ आली आहे,” असंही सचिन सावंत यांनी सांगितलं. यावेळी सचिन सावंत यांनी या सर्व प्रकाराचा जाहीर निषेधही केलाय.

हेही वाचा :

100 कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना CBI कडून क्लीनचिट?

विरोधकांनी अनिल देशमुखांवर तोंडसुख घेतलं, त्यांना बदनाम केलं, पण सत्य समोर आलंच: मिटकरी

सुप्रीम कोर्टाची ईडी, सीबीआय कारवाईवर शंका; नवाब मलिक म्हणतात, याचा अर्थ सूडभावनेनेच कारवाई

व्हिडीओ पाहा :

Sachin Sawant criticize Modi government over CBI report clean cheat Anil Deshmukh