AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार, 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण, संभाजी छत्रपतींकडून घोषणा

मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचं खासदार संभाजी छत्रपती म्हणाले. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी खासदार संभाजी छत्रपती पुन्हा आक्रमक होत आहेत.

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार, 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण, संभाजी छत्रपतींकडून घोषणा
संभाजी छत्रपती
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Feb 14, 2022 | 1:32 PM
Share

मुंबई : राज्यसभा खासदार संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) लढ्यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचं खासदार संभाजी छत्रपती म्हणाले. मी एकटा आमरण उपोषण करणार आहे. मराठा समाजाला गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करतोय,असं संभाजी छत्रपती म्हणाले.  शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj) 18 पगड जाती, बारा बलुतेदारांना घेऊन स्वराज्य स्थापन केलं. राजर्षी शाहू महाराजांनी बहुजनांना 50 टक्के आरक्षण दिलं. त्यामध्ये अनूसूचित जाती, अनूसूचित जाती, ओबीसी आणि मराठा समाज यांचा समावेश होता. 2007 पासून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यावेळी मराठा समाज हा बहुजन समाजाचा भाग आहे. मराठा समाज आणि बारा बलुतेदारांना एकत्र कसं आणता येईल, यासाठी प्रयत्न केला. 5 मे 2021 ला मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं. त्यानंतर आंदोलनं केली. मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला, आक्रमक आंदोलन केली. मात्र, आता उद्विग्न झालोय. माझा कोणत्याही पक्षातील नेत्यांना विरोध नाही. ज्यावेळी आरक्षण रद्द झालं त्यावेळी सगळ्या घटकांना एकत्र घेऊन आपलं आरक्षण रद्द कसं झालं यासंदर्भात राजकीय नेत्यांसमोर भूमिका माडंली.

मराठा समाजाला मागास सिद्ध करावं लागेल

मराठा समाजातील लोकांना आणि महाराष्ट्रातील लोकांना सांगत आलोय की वेळोवेळी भूमिका मांडत आलोय. पूनर्विचार याचिका करा पण वेळ गेला नंतर ती याचिका फेटाळली गेली. यानंतर भोसले समिती स्थापन करण्यात आली. मराठा समाज जोपर्यंत सामाजिक मागासलेपणा सिद्ध होत नाही, तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही. मराठा समाजाला पुढारलेला समाज म्हटलं गेलं.

मराठा समाज मागास सिद्ध झाला तर काय

केंद्र सरकारनं काय सांगितलं तर राज्यांना आरक्षण द्या म्हणून पण सध्या 52 टक्के आरक्षण आहे. मग, 50 टक्के मध्ये आरक्षण कसं देणार आहे. मग, इंद्रा सहाणीच्या निकालानुसार अपवादात्मक स्थिती निर्माण झाल्यास आरक्षण द्यावं. मी सत्ताधारी पक्षाला राज्यसभेत बोलायची विनंती केली. मात्र, मला बोलू दिलं नाही. मग, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हस्तक्षेप केला. केंद्र सरकारनं सरसकट सामाजिक मागास आहेत, जाट, गुर्जर आणि मराठा समाजाला आरक्षण देऊन टाकावं, असं संभाजी छत्रपती म्हणाले.

पाहा व्हिडीओ:

मी शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आहे. माझी मागणी हिच आहे की आम्हाला टिकणार आरक्षण द्यावं. 5 मे 2021 ला ज्यावेळी आरक्षण रद्द झालं तेव्हा सगळ्यांच्या दारी गेलो आणि हात जोडून मार्ग काढण्याची विनंती केली. महाराष्ट्र सरकारच्या हातात जे आहे त्या गोष्टी करण्याची विनंती केली. कोल्हापूरच्या आंदोलनानंतर मिटींग बोलावली आणि त्यामध्ये पाच ते सात मागण्यापूर्ण करण्याची विनंती केली. मराठा आरक्षण आणि समाजाच्या प्रश्नांसाठी 26 फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं खासदार संभाजी छत्रपती म्हणाले.

इतर बातम्या:

CTET Result : सीटीईटी परीक्षा निकालाची प्रतीक्षा संपणार? सीबीएसईकडून निकाल जाहीर होण्याची शक्यता

तुम्हाला आंदोलन करता येणार नाही, आझाद मैदानात जा, पोलिसांनी नाना पटोलेंना अडवलं; पोलीस आणि पटोलेंमध्ये काय संवाद झाला?

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...