Sharad Pawar: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर शरद पवारांचं मोठं विधान! एकत्र लढणार? पवारांसमोर 2 ऑप्शन!

काहींना सरकारमध्ये एकत्र असल्यामुळे निवडणूकही एकत्र लढवावी, असं वाटत असल्याची माहिती शरद पवारांनी दिली.

Sharad Pawar: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर शरद पवारांचं मोठं विधान! एकत्र लढणार? पवारांसमोर 2 ऑप्शन!
शरद पवारांनी नेमकं काय म्हटलं?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 11:12 AM

कोल्हापूर : सुप्रीम कोर्टानं ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याबाबत सांगितलं. त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Ghadi) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Maharashtra Local Body Election) एकत्र लढवणार की वेगवेगळ्या लढवणार, हा मुद्दा चर्चेत आलाय. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) यावरुन मोठं विधान केलं. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होतं. कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाब शरद पवारांनी स्पष्टपणे आपल्यासमोर असणारे दोन पर्यायच सांगून टाकले. मात्र अद्याप कोणत्याही निर्णय याबाबत झाला नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. या चर्चेत दोन मतप्रवाह समोर आल्याची माहिती शरद पवारांनी यावेळी दिली.

एकत्र लढणार?

लवकरच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील नेते एकजुटीनं निवडणुकीला सामोरे जातात का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अशातच शरद पवारांनी केलेल्या विधानालाही महत्त्व प्राप्त झालंय.

शरद पवार यांना कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात याबाबत दोन मतप्रवाह असल्याचं म्हटलंय. काहींच्या मते प्रत्येकांनं आपआपल्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवावी आणि निवडणूक झाल्यानंतर त्यावर एकत्रित यावं.

हे सुद्धा वाचा

तर काहींना सरकारमध्ये एकत्र असल्यामुळे निवडणूकही एकत्र लढवावी, असं वाटत असल्याची माहिती शरद पवारांनी दिली. सरकारमध्ये एकत्र असल्यानं एकत्र निवडणूक लढवली, तर ते सरकारसाठीही चांगलं राहिल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काहींनी नोंदवल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

दरम्यान, महाविकास आघाडीमधील इतर मित्रपक्षांची मतं आणि त्यांची विचारधारा काय आहे, हे आपल्याला माहीत नसल्याचंही शरद पवारांनी म्हटलंय. त्यामुळे यावर थेट वक्तव्य करणं योग्य नाही असंही ते म्हणालेत. दरम्यान, एकमेकांची मतं कळल्यानंतर मी जाहीरपणे त्यावर बोलेन, असंही शरद पवारांनी यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

पाहा व्हिडीओ : शरद पवारांनी नेमकं काय म्हटलं?

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.