ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची बदली अन्यायकारक, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा संताप

ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले (Sassoon dean Dr Ajay Chandanwale transferred) यांची अचानक बदली करण्यात आली आहे. त्याला मार्डने विरोध केला आहे.

ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची बदली अन्यायकारक, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा संताप

पुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले (Sassoon dean Dr Ajay Chandanwale transferred) यांची अचानक बदली करण्यात आल्याने, त्याचा निषेध मार्डचे डॉक्टर आणि ससूनच्या कर्मचाऱ्यांनी केला. राजकीय दबावातून ही बदली झाल्याचा आरोप मार्डच्या डॉक्टरांनी केला आहे. त्यामुळे मार्डचे डॉक्टर आणि कर्मचारी ससूनच्या (Sassoon dean Dr Ajay Chandanwale transferred) आवारात एकत्र जमून ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. डॉ. चंदनवाले यांच्या तडकाफडकी बदलीला मार्डचा विरोध आहे.

ससून रुग्णालयात 15 दिवसात 38 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्याचा मृत्यूदर देशात सर्वाधिक आहे. त्याचाच ठपका ठेवून डॉ. चंदनवाले यांची बदली करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. डॉ. चंदनवाले यांच्या बदलीनंतर उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.

पुण्यात कोरोना व्हायरसचा उद्रेक झाला आहे, मात्र अशा परिस्थितीत ससून रुग्णालयाचे डीन अजय चंदनवाले यांची हकालपट्टी करण्यात आली. अजय चंदनवाले यांच्या हाकालपट्टीचा मार्ड, डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांनी निषेध केला. काही कर्मचाऱ्यांनी कॅज्युअल् मधील काम थांबवलं.

ससून वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात जमत बदली चुकीची असल्याचा आरोप त्यांनी केला. ससून रुग्णालयातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूला कारणीभूत धरुन केलेली बदली चुकीचे आहे. सध्या इमर्जन्सी असून रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशा कठीण काळात तडकाफडकी बदली योग्य आहे का असा सवाल त्यांनी केला आहे. रुग्णांच्या मृत्यूची चौकशी करावी मात्र अशी अचानक बदली अन्यायकारक असल्याची भावना अन्य डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

ससूनमध्ये 11 मजली इमारत कोविड 19 हॉस्पिटल

कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयातील विशेष कोविड 19 हॉस्पिटल 12 एप्रिलपासून कार्यरत झालं आहे. नवीन अकरा मजली इमारत विशेष कोविड 19 हॉस्पिटल म्हणून मान्यता देण्यात आली आहे. केवळ पंधरा दिवसात हॉस्पिटलमधील सर्व पायाभूत सुविधा पूर्ण करण्यात आल्या.

या इमारतीच्या पाचव्या सहाव्या आणि सातव्या मजल्यावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. इथं 50 बेडचा आयसीयू, 100 बेड आयसोलेशन, 13 हजार लिटर ऑक्सिजन पाईपलाईन आणि 300 टनाच्या एसीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर निष्णात डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचारीही कार्यरत आहेत. एकाच इमारतीत सर्व रुग्णांना सर्व सुविधायुक्त उपचार देण्यासाठी या हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या 

राज्यातील सर्वाधिक ‘कोरोना’बळी मुंबईत, मात्र महाराष्ट्रातील सर्वाधिक मृत्यूदर पुण्यात  

Corona : पुणे विभागात 518 कोरोनाबाधित, आतापर्यंत 47 जणांचा बळी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *