SRH vs RR Eliminator Live Score Updates, IPL 2026 : यशस्वी जैस्वाल आऊट, राजस्थानला दुसरा धक्का, सलामी जोडी माघारी

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals, Eliminator Indian Premier League 2026 Live Score and Updates : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातून आज एका संघाचा प्रवास संपणार आहे. तर विजयी संघ क्वालिफायर 2 साठी पात्र होणार आहे. आता कोणता संघ विजयी होणार? याची उत्सूकता शिगेला पोहचली आहे.

SRH vs RR Eliminator Live Score Updates, IPL 2026 : यशस्वी जैस्वाल आऊट, राजस्थानला दुसरा धक्का, सलामी जोडी माघारी
SRH vs RR Eliminator IPL 2026 Live Blog
Image Credit source: TV9
| Updated on: May 27, 2026 | 8:32 PM

LIVE Cricket Score & Updates

  • 27 May 2026 08:32 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Score Updates : यशस्वी जैस्वाल आऊट, राजस्थानला दुसरा धक्का, सलामी जोडी माघारी

    सनराययझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला दुसरा झटका दिला आहे. शिवांग कुमार याने यशस्वीला अभिषेक शर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. यशस्वीने 29 बॉलमध्ये 29 रन्स केल्या.

  • 27 May 2026 08:21 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Score Updates : वैभव सूर्यवंशी 97 रन्सवर आऊट, राजस्थानला पहिला झटका

    प्रफुल्ल हिंगे याने अखेर वैभव सूर्यवंशी याला आऊट करत राजस्थानला पहिला झटका दिला आहे. प्रफुल्लने स्फोटक बॅटिंग करणाऱ्या वैभव सूर्यवंशी याला स्मरण रवीचंद्रन याच्या हाती कॅच आऊट केलं. वैभवने हैदराबाद विरुद्ध 29 बॉलमध्ये 12 सिक्स आणि 5 फोरसह 97 रन्स केल्या.

  • 27 May 2026 08:13 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Score Updates : वैभव-यशस्वीची सलामी जोडीची शतकी भागीदारी, हैदराबाद बेहाल

    वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीने राजस्थानला जबरदस्त सुरुवात मिळवून दिली आहे. या दोघांनी 7.2 ओव्हरध्ये शतकी भागीदारी केलीय. वैभव 77 आणि यशस्वी 25 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.

  • 27 May 2026 07:53 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Score Updates : वैभव सूर्यवंशीचा तडाखा, हैदराबाद विरुद्ध चाबूक अर्धशतक

    वैभव सूर्यवंशी याने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चाबूक अर्धशतक झळकावलं आहे. वैभवने 16 चेंडूत हे अर्धशतक पूर्ण केलं. वैभवचं हे पाचवं अर्धशतक ठरलं.

  • 27 May 2026 07:49 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Score Updates : वैभव-यशस्वी सलामी जोडीची अर्धशतकी भागीदारी, राजस्थानची कडक सुरुवात

    वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीने अवघ्या 19 बॉलमध्ये अर्धशतकी भागीदारी करुन राजस्थानला चाबूक सुरुवात करुन दिली आहे. या भागीदारीत वैभवने 42 आणि यशस्वीने 8 धावांचं योगदान दिलंय.

  • 27 May 2026 07:32 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Score Updates : सामन्याला सुरुवात, राजस्थानची बॅटिंग, यशस्वी-वैभव सलामी जोडी मैदानात

    राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद एलिमिनेटर सामन्याला सुरुवात झाली आहे. हैदराबादने टॉस जिंकून राजस्थानला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. राजस्थानकडून यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी सलामी जोडी मैदानात आली आहे.

  • 27 May 2026 07:09 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Updates : राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन

    राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग (कर्णधार), डोनोवन फरेरा, दासून शनाका, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा आणि यशराज पुंजा.

  • 27 May 2026 07:08 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Updates : सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन

    सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, स्मरण रविचंद्रन, नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, एशान मलिंगा, साकिब हुसेन आणि प्रफुल हिंगे.

  • 27 May 2026 07:04 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live: हैदराबादचा राजस्थान विरुद्ध टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

    सनरायझर्स हैदराबादने एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध टॉस जिंकला आहे. हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स याने फिल्डिंगचा निर्णय घेत राजस्थानला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे आता राजस्थान किती धावांचा आकडा गाठणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 27 May 2026 06:55 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live: हैदराबाद-राजस्थानमध्ये एलिमिनेरटरचा थरार, थोड्याच वेळात टॉस, कोण जिंकणार?

    सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याला थोड्याच वेळात संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे. टॉस कोणता संघ जिंकणार? याचं थोड्याच वेळात उत्तर मिळणार आहे.

     

  • 27 May 2026 06:44 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live: राजस्थान रॉयल्स टीम

    राजस्थान रॉयल्स टीम : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रियान पराग (कर्णधार), डोनोवन फरेरा, शुभम दुबे, दासून शनाका, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, यशराज पुंजा, ब्रिजेश शर्मा, रवींद्र जडेजा, सुशांत मिश्रा, अमन राव पेराला, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, ॲडम मिलने, संदीप शर्मा, शिमरॉन हेटमायर, कुलदीप सेन, युधवीर सिंग चरक, क्वेना माफाका, लुआन-ड्रे प्रिटोरियस, इमानजोत सिंग चहल आणि विघ्नेश पुथूर.

  • 27 May 2026 06:42 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live: सनरायझर्स हैदराबाद टीम

    सनरायझर्स हैदराबाद टीम : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, स्मरण रविचंद्रन, नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, इशान मलिंगा, साकिब हुसेन, प्रफुल्ल हिंगे, अनिकेत वर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, हर्ष दुबे, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, कामिंदू मेंडिस, झीशान अन्सारी, जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, क्रेन्स फुलेत्रा, ओंकार तरमाळे, आरएस अंबरीश आणि अमित कुमार.

  • 27 May 2026 06:40 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Updates : हैदराबाद-राजस्थान सज्ज, कोण जिंकणार?

    क्वालिफायर-2 फेरीत पोहचण्यासाठी थोड्याच वेळात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात महामुकाबला होणार आहे. विजयी संघ क्वालिफायर 2 साठी पात्र ठरेल. तर पराभूत संघाचं पॅकअप होईल.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) प्लेऑफ स्पर्धेत एलिमिनेटरचा सामना रंगत आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. सामन्याचं आयोजन हे मुल्लानपुरमधील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामना जिंकणारा संघ क्वालिफायर 2 मध्ये पोहचेल. तर पराभूत संघाचं स्पर्धेतून पॅकअप होईल. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामन्यातील प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.

Follow Us