टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत 1500 कोटींची कमाई अशीच झाली, या तीन सामन्यांचं मोठं योगदान

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत चांगली कमाई झाली आहे. त्यामुळे आयोजक आणि या स्पर्धेशी निगडीत ब्रँड्सचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. फक्त जाहिरातीतून हजारो कोटींची कमाई झाली आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत 1500 कोटींची कमाई अशीच झाली, या तीन सामन्यांचं मोठं योगदान
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत 1500 कोटींची कमाई अशीच झाली, या तीन सामन्यांचं मोठं योगदान
Image Credit source: Icc X account
| Updated on: Mar 13, 2026 | 6:49 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला प्रबळ दावेदार होती. त्या पद्धतीने टीम इंडियाने या स्पर्धेत खेळ दाखवला आणि जेतेपद मिळवलं. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा आणि या स्पर्धेच्या इतिहासातील तिसरं जेतेपद मिळवलं. त्यामुळे संपूर्ण देशात आनंदाची लाट उसळली.  क्रिकेट वेड्या देशात या स्पर्धेचं आयोजन असल्याने प्रेक्षकांनी भरभरून साथ दिली. प्रत्येक सामन्याला मैदानात प्रेक्षकांनी गच्च भरलेलं होतं. दरम्यान, बीसीसीआयने या स्पर्धेतील जेतेपदानंतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफवर बक्षिसांचा वर्षाव केला. गेल्या वर्ल्डकप तुलनेत 6 कोटी अधिक दिले. म्हणजेच बक्षिसाच्या रुपाने 131 कोटी रूपये दिले. या स्पर्धेतून टीम इंडिया, खेळाडू आणि क्रीडाप्रेमीच आनंदी झाले नाहीत, तर आयसीसी आणि या स्पर्धेशी निगडीत ब्रँड्सनाही फायदा झाला आहे. एका रिपोर्टनुसार, टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत फक्त जाहिरातीच्या माध्यमातून हजारो कोटींची कमाई झाली आहे. वर्ल्डकपशी निगडीत कंपनी आणि आयोजकांना मोठी कमाई करता आली. एक्सचेंज फॉर मीडियाच्या एका रिपोर्टमध्ये केलेल्या दाव्यानुसार, वर्ल्डकप स्पर्धेत फक्त जाहिरातीच्या माध्यमातून 1500 कोटीहून अधिकची कमाई झाली आहे. हा प्राथमिक अंदाज असून यात आणखी वाढ होऊ शकते.

या स्पर्धेत तीन सामने कमाईचं मोठं साधन ठरले. यात भारत पाकिस्तान सामना, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचा सामना होता. या सामन्यांसाठी जाहिरातींचे दर अधिक होते. रिपोर्टमध्ये इंडस्ट्रीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगितलं की, वर्ल्डकपमधील साखळी फेरीतील सामन्यांच्या जाहिरातीचा दर 10 सेकंदासाठी 7.5 लाखांच्या आसपास होता. तर स्पर्धा जशी पुढे सरकली तसा हा दर 15-16 लाखांच्या घरात गेला. भारत पाकिस्तान सामना सर्वाधिक फायदा देणारा ठरला. वादाच्या पार्श्वभूमीवर या सामन्याचं महत्त्व वाढलं होतं. या सामन्यासाठी प्रत्येक 10 सेकंदासाठी 20-25 लाख मोजले गेले.

उपांत्य आणि अंतिम फेरीच्या सामन्यासाठी जाहिरातीचे दर 15 ते 20 लाखांच्या घरात होते. एका रिपोर्टनुसार, अरामको, डीपी वर्ल्ड आणि एमीरेट्स हे आयसीसीचे तीन प्रमुख प्रायोजक होते. या कंपन्यांनी 75-75 कोटी रुपये जाहिरातीवर खर्च केले. तर इतर कंपन्यांनांनी 15.20 कोटी खर्च केले.

Follow Us