Thailand Open : पीव्ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत, अकाने यामागुचीशी भिडणार सिंधू, श्रीकांत स्पर्धेतून बाहेर

Thailand Open : पीव्ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत, अकाने यामागुचीशी भिडणार सिंधू,  श्रीकांत स्पर्धेतून बाहेर
पीव्ही सिंधू
Image Credit source: social

आता शेवटच्या आठमध्ये तिचा सामना दुसऱ्या मानांकित जपानच्या अकाने यामागुचीशी होईल.

शुभम कुलकर्णी

|

May 20, 2022 | 11:42 AM

मुंबई : जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या पीव्ही सिंधूने (pv sindhu) कोरियाच्या सिम यू जिनचा 37 मिनिटांत पराभव करत थायलंड ओपन (Thailand Open) 500 सुपर सीरिजच्या उपांत्यपूर्व फेरीत (quarter-finals) प्रवेश केला. आता शेवटच्या आठमध्ये तिचा सामना दुसऱ्या मानांकित जपानच्या अकाने यामागुचीशी होईल. थॉमस कपमध्ये भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या किदाम्बी श्रीकांतने शेवटच्या क्षणी स्पर्धेतून माघार घेतली. त्याने दुसऱ्या फेरीत आयर्लंडच्या न्हाट गुयेनला वॉक ओव्हर दिला. या स्पर्धेत देशासमोर सिंधूचे एकमेव आव्हान उरले आहे. मालविका बनसोड यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. तर दुसऱ्या फेरीत मालविकाला डेन्मार्कच्या लिन क्रिस्टोफरसनकडून 21-16, 14-21, -14-21 असा पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत अश्वनी भट्ट आणि शिखा गौतम यांचा जपानच्या मायो मात्सुमोटो आणि वाकाना नागहारा या पाचव्या मानांकित जोडीने 19-21, 6-21 असा पराभव केला.

 सिंधूची यामागुचीशी लढत

कोरियन सिम यू जिनचा 21-16, 21-13 असा पराभव केला. सिंधूने 13 वेळा जपानच्या यामागुचीचा पराभव केला आहे. परंतु आशियाई चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत तिला जपानच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला आहे. यामागुचीने कोरियाच्या किम गा युनचा 21-23, 21-15, 21-16 असा चुरशीच्या लढतीत पराभव केला. श्रीकांतने स्पर्धेतून माघार घेण्यामागचे कारण स्पष्ट केलेले नाही.

पीव्ही सिंधूने कोरियाच्या सिम यू जिनचा 37 मिनिटांत पराभव करत थायलंड ओपन 500 सुपर सीरिजच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता शेवटच्या आठमध्ये तिचा सामना दुसऱ्या मानांकित जपानच्या अकाने यामागुचीशी होईल. थॉमस कपमध्ये भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या किदाम्बी श्रीकांतने शेवटच्या क्षणी स्पर्धेतून माघार घेतली. त्याने दुसऱ्या फेरीत आयर्लंडच्या न्हाट गुयेनला वॉक ओव्हर दिला. या स्पर्धेत देशासमोर सिंधूचे एकमेव आव्हान उरले आहे. मालविका बनसोड यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले.

हे सुद्धा वाचा

मालविकाला संघर्षात पराभव पत्करावा लागला

दुसऱ्या फेरीत मालविकाला डेन्मार्कच्या लिन क्रिस्टोफरसनकडून 21-16, 14-21, -14-21 असा पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत अश्वनी भट्ट आणि शिखा गौतम यांचा जपानच्या मायो मात्सुमोटो आणि वाकाना नागहारा या पाचव्या मानांकित जोडीने 19-21, 6-21 असा पराभव केला. महिला दुहेरीत इशान भटनागर आणि तनिषा क्रास्टो यांना गोह सून हुआट आणि लाई चेव्हॉन जेमी या सहाव्या मानांकित मलेशियाच्या जोडीने 19-21, 20-22 ने पराभूत केले.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें