AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोष्ट एका अशा शहराची जे रातोरात झालं रिकामं, ज्याला म्हणतात भुतांचं शहर!

भूत ऐकताच लोक खूप घाबरतात. आज आम्ही तुम्हाला एका अशा शहराची गोष्ट सांगणार आहोत जिथे भूताच्या भीतीने हजारो लोक रातोरात शहरातून पळून गेले. तब्बल 45 वर्षे उलटून गेली तरी हे शहर अजूनही निर्जनच आहे.

गोष्ट एका अशा शहराची जे रातोरात झालं रिकामं, ज्याला म्हणतात भुतांचं शहर!
Cyprus VaroshaImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 23, 2023 | 6:10 PM
Share

जगात भूतं आहेत की नाही याबद्दल आजवर कोणतेही ठोस संशोधन समोर आलेले नाही. मात्र, लोकांचे मनोरंजन करण्यासाठी या विषयावर बरेच सिनेमे बनवण्यात आले आहेत. असे असूनही भूत ऐकताच लोक खूप घाबरतात. आज आम्ही तुम्हाला एका अशा शहराची गोष्ट सांगणार आहोत जिथे भूताच्या भीतीने हजारो लोक रातोरात शहरातून पळून गेले. तब्बल 45 वर्षे उलटून गेली तरी हे शहर अजूनही निर्जनच आहे.

1974 मध्ये तुर्कस्तानच्या सैन्याने केला हल्ला

हे भुताचे शहर युरोपियन देश सायप्रसमधील वरोशा शहर (Cyprus Varosha City) आहे. फमागस्ता प्रांतातील हे शहर एकेकाळी ४० हजार लोकसंख्या असलेले संपन्न शहर होते. इथे हॉटेल, रेस्टॉरंट, समुद्र किनारे, रुग्णालये, शाळा, बाजारपेठा, रस्ते होते. जुलै १९७४ मध्ये तुर्की सैन्याने सायप्रसच्या या शहरावर हल्ला केला. ग्रीसमधील राष्ट्रवादी उठावाला पाठिंबा दिल्याबद्दल तुर्की सरकार सायप्रसवर नाराज होते. सायप्रसला धडा शिकवण्यासाठी त्यांनी वरोशावर हल्ला केला.

एका रात्रीत 40 हजार लोकांचे स्थलांतर

तुर्कीच्या सैन्याने सायप्रसमधील नागरी तळ उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली. तुर्कस्तानकडून होणाऱ्या नरसंहाराच्या भीतीने ४० हजार लोकांनी रातोरात संपूर्ण शहर रिकामे केले. लोक शहर सोडून जाण्यामागे एका अफवेचाही मोठा वाटा आहे. वरोशामध्ये एक भूत असल्याची अफवा पसरली. हे भूत एकापाठोपाठ एक लोकांना मारत आहे अशी ही अफवा होती. ही अफवा इतकी जोरदार होती की लोकांनी काहीच विचार न करता रातोरात स्थलांतर केले. आजही या घटनेची जोरदार चर्चा आहे.

45 वर्षांनंतरही वरोशा शहर सुनसान

लोक पळून गेल्यानंतर हे शहर तुर्कस्तानच्या ताब्यात गेले. सुमारे 45 वर्षांनंतर, शहर (सायप्रस वरोशा सिटी) अद्याप तुर्की सैन्याच्या नियंत्रणाखाली आहे. भीतीमुळे हे शहर सुनसान आहे. वरोशा समुद्रकिनारा कायमचा बंद करण्यात आला आहे. हॉटेल्स, इमारती, रेस्टॉरंट्स आणि इतर इमारती आता सुनसान आहेत. तुर्कीच्या सैन्याने या शहराभोवती कुंपण घातले आहे. तुर्की सैन्याच्या परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीला या शहरात प्रवेश करता येणार नाही. जर कोणी असे करताना आढळले तर तुर्की सैन्य त्याला ताबडतोब तुरुंगात टाकते.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.