Gold Jewellery : सराफा दुकानदाराने लावला तर नाही ना चूना! खरे-खोटे सोने कसे ओळखाल

Gold Jewellery : कधी कधी सराफा दुकानदार ग्राहकांची फसवणूक करतात. खरे-खोटे सोने कसे ओळखाल, त्याची पारख कशी कराल.

Gold Jewellery : सराफा दुकानदाराने लावला तर नाही ना चूना! खरे-खोटे सोने कसे ओळखाल
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 6:00 PM

नवी दिल्ली : सोन्यातील गुंतवणूक (Gold Investment) ही भारतीयांसाठी अनेक वर्षांपासून लोकप्रिय पर्याय राहिला आहे. सोन्याला भारतीय संस्कृतीत धन, समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतिक मानण्यात येते. सणावारात सोन्याचे दागिने, आभुषणे, तुकडा, शिक्के खरेदी करुन भेट देण्याचा प्रघात आहे. प्रथा आहे. तुम्ही सोन्याचे दागिने, शिक्के सोनार, सराफा दुकानदाराकडून खरेदी करु शकता. पण बऱ्याचदा ग्राहकांची दुकानदार फसवणूक करतात. कमी कॅरेट सोने जास्त कॅरेटचे सांगून ही फसवणूक करण्यात येते. अस्सल सोन्याचा दाम मोजून ग्राहक खोटे सोने (Fake Gold) घरी आणतात. ज्यावेळी हे सोने विक्री करायची वेळ येते. त्यावेळी खरा प्रकार समोर येतो. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

हॉलमार्क शिक्का हॉलमार्क चाचणी ही सोन्याची शुद्धता तपासण्याचा प्राथमिक पर्याय आहे. सोन्याच्या प्रत्येक तुकड्यावर त्याची शुद्धता हॉलमार्कच्या चिन्हावरुन दिसून येते. दागिन्याच्या मागील, आंगठ्या, ब्रेसलेट यांच्या पाठीमागे, आतील बाजूवर हे चिन्ह अंकित असते. हॉलमार्क शुद्ध सोन्याची हमी देतो. भारतीय मानक ब्यूरो (BIS ) द्वारे प्रमाणित शुद्ध सोन्याची ही हमी असते. दागिने तयार करणारे त्यावर हॉलमार्क लावतात.

हॉलमार्क चाचणी प्रत्येक निर्माता सोन्याच्या दागिन्यावर हॉलमार्क अंकित करतो. तुम्हाला कुठलाही खर्च न करता घराच्या घरी सोन्याची शुद्धता तपासता येते. त्यासाठी हॉलमार्क टेस्ट करता येते. भारतीय मानक ब्यूरोची (BIS ) स्थापना भारत सरकारने केली आहे. सोन्याचे दागिने आणि सोन्याचे शिक्के प्रमाणित करण्यासाठी बीआयएसचा उपयोग होतो.

हे सुद्धा वाचा

चुंबकीय टेस्ट शुद्ध सोने चुंबकीय नसते. तर अन्य धातू चुंबकीय असतात. जर तुमच्याकडे एक चांगले चुंबक असेल तर सहजरित्या त्याची शुद्धता तपासता येते. तुमचे सोने शुद्ध आहे की नकली याचा तपास करता येतो. जर हे सोने चुंबकाकडे आकर्षित झाले तर ते खोटे सोने आहे. ते शुद्ध सोने नाही. या सोन्यात इतर धातूंचे अधिक प्रमाण असेल तर ते चुंबकाकडे आकर्षित होईल. चुंबक सहज उपलब्ध होत असल्याने तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी याचा उपयोग करता येईल.

फ्लोट टेस्ट सोन्यात जास्त घनता असते. फ्लोट टेस्टद्वारे सोन्याच्या दागिन्यांचा खरे-खोटेपणा निश्चित होतो. याद्वारे अस्सल सोने ओळखता येते. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी हा सोपा उपाय आहे. जर सोने तुम्ही पाण्याच्या बादलीत टाकले आणि बुडाले तर ते शुद्ध सोने आहे. इतर धातू त्यात अधिक प्रमाणात असतील तर हे सोने पाण्यावर तरंगेल. शुद्ध सोने जड असते. नकली सोन्यात लोहाचे अथवा इतर धातूचे प्रमाण अधिक असेल तरी पण हे सोने भाड्यांच्या तळाशी जाऊन बसेल. त्यामुळे सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी ही योग्य चाचणी नाही.

ॲसिड टेस्ट ॲसिड टेस्ट घरच्या घरी करता येते. याचे परिणाम अचूक असते. पण रसायनाचा वापर असल्याने अत्यंत सावधपणे ही चाचणी करता येते. हाइड्रोक्लोरिक ॲसिड आणि नाइट्रिक ॲसिड युक्त गोल्ड टेस्टिंग ॲसिड किटचा वापर त्यासाठी करता येतो. सराफाकडे असतो तसा एक काळा दगड या प्रयोगासाठी आवश्यक असतो. पण योग्य तज्ज्ञाच्या आधारेच हा प्रयोग करावा.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.