आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास

| Updated on: Mar 28, 2024 | 7:35 PM

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ठाण लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांनी आज शिवजयंती निमित्त प्रभू शिवरायांना अभिवादन करीत आज ठाण्यात आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी राजन विचारे यांना हॅट्रीकसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Follow us on

ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करीत आपल्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी स्वर्गीय आनंद दिघे यांचे शिष्य असलेल्या राजन विचारे यांची यंदा हॅट्रीक होईल अशा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. कल्याण लोकसभा मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात त्यांचे नाव घेतले जात आहे याबद्दल विचारले असता त्यांनी आपण हे केवळ मिडीयातूनच ऐकले आहे. आपल्याला अधिकृत असे काही सांगितलेले नाही. परंतू पक्षाने आदेश दिल्यास तो पाळण्याचे आम्हाला बाळासाहेबांनी शिकविले आहे. त्यामुळे उद्धव साहेब जो आदेश देतील तो पाळला जाईल असेही केदार दिघे यांनी सांगितले. ठाणे लोकसभा मतदार संघातून महायुतीने अद्याप कोणाचे नाव जाहीर केलेले नाही. तर कल्याण लोकसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून कोणाचेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही. केदार दिघे हे तत्कालिन शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे आहेत.