Chitra Wagh : चित्रा वाघ यांनी आक्रमक होत कुणाचा काढला बाप; म्हणाल्या, तुमच्या बापाला जाऊन विचारा

| Updated on: Oct 14, 2023 | 6:18 PM

VIDEO | भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बेताल वक्तव्य कराल तर अशीचं ठोक उत्तर यापुढेही मिळतील....

Follow us on

मुंबई, १४ ऑक्टोबर २०२३ | भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. चित्रा वाघ म्हणाल्या, लक्षात आले असेल एव्हाना भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बेताल वक्तव्य कराल तर अशीचं ठोक उत्तर यापुढेही मिळतील, असा इशारा भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दिलाय. पुढे त्या असंही म्हणाल्या, स्वत: साळसूदपणाचा आव आणत कुणा बाबूमिया बलात्काऱ्याला तुम्ही लिहीलेल्या स्क्रीप्टचं वाचन करायला लावलतं. मला तुम्हाला आणि तुमच्या चेल्याचपाट्यांना सांगायचंय, मी काय आहे आणि माझं कॅरेक्टर काय आहे हे शरद पवार यांना विचारा, बोली भाषेत म्हणायचं तर तुमच्या बापाला जाऊन विचारा, असे म्हणत चित्रा वाघ यांनी सडकून टीका केली. माझ्या टीकेने कितीही घायकुतीला आलात तरी तुमचे डायलॉग डिलिव्हरी करायला हा बाबूमिया बलात्कारी सारखी माणसं निवडू नका, असा सल्ला चित्रा वाघ यांनी दिला.