Special Report | ‘पवार विसरले का, दाऊदला विमानात कुणी बसवलं ?’
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव दाऊद वानखेडे असल्याचा दावा केला आहे. मलिक यांनी वारंवार हा मुद्दा उपस्थित केल्याने भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यावरून थेट नवाब मलिक यांनाच सवाल केला आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव दाऊद वानखेडे असल्याचा दावा केला आहे. मलिक यांनी वारंवार हा मुद्दा उपस्थित केल्याने भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यावरून थेट नवाब मलिक यांनाच सवाल केला आहे. दाऊदला विमानात कोणी बसवलं? त्याच्यासोबत कोण होतं? असा सवालच किरीट सोमय्या यांनी केला. भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात किरीट सोमय्या बोलत होते. समीर तुझे वडील ज्ञानदेव नाहीत, दाऊद आहे… दाऊद आहेत… त्यांचा बाप नाही. तुमचा बाप आहे. ठाकरे सरकारमधील शरद पवारांना जाऊन विचारा, 199-94मध्ये दाऊदसोबत विमाना कोण बसलं होतं? असा सवाल सोमय्या यांनी केला. विसरले का शरद पवार, दाऊदला विमानत कोणी बसवलं होतं? कोण त्यांच्यासोबत बसलं होतं? दाऊद काढताय … ठाकरे पवारांना लाज वाटली पाहिजे, अशी टीकाही सोमय्या यांनी केली.
Published on: Oct 31, 2021 09:33 PM
