उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?

उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?

| Updated on: Mar 22, 2026 | 2:28 PM

शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज अचानक त्यांच्या मातोश्री निवासस्थानी त्यांच्या खासदारांची एक बैठक बोलावली होती. या बैठकी मागचे प्रयोजन नेमके काय असा सवाल केला जात आहे. ही बैठक डॅमेज कंट्रोलसाठी असल्याचे म्हटले जात आहे.

शिवसेनेचे पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मातोश्री निवासस्थानी खासदारांशी गुफ्तगू केले आहे. या बैठकीला अनेक कारणे असल्याचे म्हटले जात आहे. शिवसेना फोडून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे यांचा नुकताच दिल्ली येथे दौरा झाला होता. या दौऱ्यानंतर शिवसेनेचे उरले सुरलेले खासदारही एकनाथ शिंदे फोडणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर खासदारांशी बोलून त्यांच्या समस्या काय आहेत. त्यांना निधी मिळत आहे की याची चाचपणी उद्धव ठाकरे करत असल्याचे म्हटले जात आहे. या बैठकीला एक प्रकारची डॅमेज कंट्रोल करण्यासाठीची बैठक म्हटले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी खासदारांची समजूत काढण्यासाठी ही बैठक घेतल्याचे म्हटले जात आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात खासदारांना निधी मिळत नाही अशी तक्रार करण्यात आली आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ही बैठक घेतल्याचे म्हटले आहे.

 

 

Published on: Mar 22, 2026 2:27 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us