22 फेब्रुवारी 2025

सामन्यापूर्वीच पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी पराभव पत्कारला!

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना 23 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे.

दुबईत होणाऱ्या या सामन्यापूर्वीच पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटून हार पत्कारली आहे.

माजी क्रिकेटपटू शोएब मलिक 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी विजयी संघाचा भाग होता.  त्याने 23 फेब्रुवारीच्या सामन्यासाठी भारताला कौल दिला आहे. 

माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने यावेळी भारताचं पारडं जड असल्याचं सांगितलं आहे. टीम इंडियात बरेच मॅच विनर खेळाडू असल्याचं सांगितलं. 

वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने सांगितलं की, न्यूझीलंडकडून पराभव झाल्याने उपांत्य फेरी गाठण्याची फक्त 40 टक्के संधी आहे. 

अहमद शहजादने सांगितलं की, टीम इंडिया फॉर्मात आहे. तर पाकिस्तानी संघात बऱ्याच उणीवा आहेत. पण काहीही होऊ शकतं. 

पाकिस्तानी क्रीडाप्रेमींनीही सामन्यापूर्वी पराभव पत्कारला आहे. भारताविरुद्ध जिंकणं कठीण असल्याचं त्यांनी सांगितलं.