उदगीरच्या शेतकऱ्यांना मिळणार आता योग्य बाजारपेठ, रेल्वे प्रशासनाने घेतला शेतकऱ्यांच्या हीताचा निर्णय

| Updated on: Nov 23, 2021 | 11:21 AM

उदगीर रेल्वेस्थानकातून इतर बाजारपेठेत शेतीमालाची निर्यात करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. अखेर दक्षिण-मध्य रेल्वे विभागाने याला मंजूरी दिली असून आता उदगीर रेल्वेस्थानकातून रेशीमकोष, आद्रक, भाज्या, फळे, फुले, मासे यांची विक्री आता योग्य बाजारपेठेत करण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर राहणार आहे.

उदगीरच्या शेतकऱ्यांना मिळणार आता योग्य बाजारपेठ, रेल्वे प्रशासनाने घेतला शेतकऱ्यांच्या हीताचा निर्णय
Follow us on

लातूर : शेतीमालाचे उत्पादन वाढत आहे पण योग्य बाजारपेठ मिळत नसल्याने शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेत मालाची विक्री करावी लागत होती. मात्र, उदगीर रेल्वेस्थानकातून इतर बाजारपेठेत शेतीमालाची निर्यात करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. अखेर दक्षिण-मध्य रेल्वे विभागाने याला मंजूरी दिली असून आता उदगीर रेल्वेस्थानकातून रेशीमकोष, आद्रक, भाज्या, फळे, फुले, मासे यांची विक्री आता योग्य बाजारपेठेत करण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर राहणार आहे.

शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचे सरकारचेही धोरण आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या या मागणीला यश मिळाले आहे. या निर्णयामुळे उदगीरसह लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीमालाची मोठ्या बाजारपेठेत निर्यांत करणे सहज शक्य होणार आहे. शेतकऱ्यांची इच्छा असतानाही बाजारपेठ उपलब्ध होत नव्हती. पण आता दक्षिण-मध्य रेल्वेने शेतकऱ्यांच्या हीताचा निर्णय घेतला आहे.

तीन स्थानकातून होणार शेतीमालाची निर्यात

उदगीर तालुक्यातील भालकी, उदगीर व बिदर या रेल्वे स्थानकातून शेतीमालाच्या वाहतूकीसाठी मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या बाजारपेठेत निर्यात आता करण्याची व्यवस्था ही झाली आहे. रेशीम कोषासह इतर शेतीमाल व मासे निर्यातीची परवानगी देण्यात आली आहे. उदगीर तालुक्यात टोमॅटो, शेवगा, चिंच, आंबे, बोरं याचे मोठे प्रमाणात उत्पादन होते. त्यामुळे शेतीमाल कोणताही असो योग्य बाजारपेठ मिळाली तर शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

या ठिकाणी होणार शेतीमालाची वाहतूक

उदगीर बसस्थानकातून दिवसाला 10 रेल्वेगाड्या धावतात. यामध्ये नांदेड, बंगळूर, मुंबई, शिर्डी, सिंकदराबाद, विजयवाडा, हैदराबाद, हडपसर, औरंगाबाद, पूर्णा या ठिकाणी शेतीमालाची वाहतूक करणे शक्य होणार आहे. शिवाय याकरिता शेतकऱ्यांना खर्चही कमी येणार आहे. आतापर्यंत उदगीर आणि बिदर येथील रेल्वेस्थानकातून केवळ रेशीम कोष ची वाहतूक केली जात होती. पण आता सर्वच शेतीमालाच्या वाहतूकीला परवानगी देण्यात आली आहे.

रेल्वेला 4 कोटी 25 लाख रुपये मिळाले देखील

सध्या सोयाबीन आणि साखरेची निर्यात करण्याचा हंगाम सुरु आहे. सोयाबीनची शेतकऱ्यांनी साठवणूक केलेली आहे तर ऊसाचे गाळप सुरु आहे. त्यामुळे भविष्यात सोयाबीन आणि साखरेची वाहतूक मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्याच अनुशंगाने रेल्वेला 4 कोटी 25 लाख रुपये भाडे देखील मिळालेले आहे. आता इतर शेतीमालाच्या उत्पादनानुसार शेतकऱ्यांचे आणि पर्यायाने रेल्वेचे देखील उत्पन्न वाढणार आहे. शेतीमालाची निर्यात करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी रेल्वे स्थानकात नोंद करण्याची अवाहन रेल्वेचे अधीक्षक दीपक जोशी यांनी केले आहे.

संबंधित बातम्या :

थकीत ‘एफआरपी’चा गुंता आता उच्च न्यायालयात, लोकवर्गणीतून उभारला जाणार लढा

बीजोत्पादनाचे दोन फायदे म्हणूनच महाबिजची गावोगावी जनजागृती, उस्मानाबादमध्येही होणार प्रयोग

शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी सरपंचानीच रोखला राष्ट्रीय महामार्ग, भाजपचाही पाठिंबा